News Flash

स्वस्त झाला Samsung चा ‘बजेट’ स्मार्टफोन, मिळेल ट्रिपल कॅमेऱ्यासह ‘जंबो’ बॅटरीही

Samsung ने किंमतीत केली कपात..

सॅमसंगचा बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 आता स्वस्त झाला आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. गेल्या महिन्यात जीएसटी वाढल्यानंतर कंपनीने या फोनच्या किंमतीत वाढ केली होती. त्यानंतर आता पुन्हा कंपनीने Galaxy M21 च्या किंमतीत कपात केली आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :
ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असलेला हा फोन अँड्रॉइड 10 वर आधारित One UI 2.0 वर कार्यरत आहे. यात मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, तर अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह 8 मेगापिक्सलचा दुसरा आणि डेप्थ सेन्सरसह 5 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. याशिवाय, सेल्फीसाठी पुढील बाजूला 20 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. सेल्फी कॅमऱ्यात AIबेस्ड फीचर्स असून फेस अनलॉक पर्यायही उपलब्ध आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह तब्बल 6,000 एमएएच क्षमतेची जंबो बॅटरी असलेल्या या फोनमध्ये हा फोन असून यामध्ये 6.4 इंच का फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) इन्फिनिटी यू सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे.  या फोनमध्ये 6 जीबी रॅमचा पर्याय असून यात कंपनीने इन्फिनिटी यू डिस्प्ले दिलाय.कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन असलेल्या या फोनमध्ये Mali-G72 MP3 GPU सोबत ऑक्टा-कोर अ‍ॅक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम21 चे इनबिल्ट स्टोरेज 128 जीबीपर्यंत असून कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस/ ए-जीपीएस, युएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकचा समावेश आहे. फोनमध्ये मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे.

किंमत :- Gadgetsnow ने दिलेल्या वृत्तानुसार, सॅमसंग कंपनीने Galaxy M21 च्या किंमतीत एक हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत आता 13,199 रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत 14,222 रुपये होती. तर, 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत आता 15,499 रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत 16,499 रुपये होती. काही दिवसांमध्ये हा फोन अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर नव्या किंमतीसह उपलब्ध होईल. हा फोन लॉन्च केला त्यावेळी कंपनीने याची बेसिक किंमत 12,999 रुपये ठेवली होती. पण, गेल्या महिन्यात जीएसटी वाढल्यानंतर कंपनीने या फोनच्या किंमतीतही वाढ केली होती. आता, कंपनीने पुन्हा एकदा या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. 13,199 या बेसिक किंमतीसह हा फोन आता खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2020 1:22 pm

Web Title: samsung galaxy m21 gets a price cut in india know new price specifications and all other details sas 89
Next Stories
1 LG कडून अनेक बंपर ऑफर्स! स्मार्टफोनवर ₹5000; तर टीव्हीवर ₹15000 पर्यंत डिस्काउंट
2 करोना वॉरिअर्सचे कॅडबरीनं मानले अनोख्या पद्धतीनं आभार
3 “जी काही ‘गंमत जंमत’ करायचीय ती लॉकडाउन संपल्यावर करा”; महाराष्ट्र पोलिसांचा सल्ला
Just Now!
X