News Flash

मोठी स्क्रीन आणि पावरफुल बॅटरी, Samsung Galaxy M30 चा आज सेल

या फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि अल्ट्रा वाइड लेंस

स्मार्टफोन बाजारातील बजेट फोनबाबत विचार केल्यास शाओमीनंतर सॅमसंग कंपनीच्या M सीरिज मालिकेतील फोन लोकप्रिय आहेत. यामध्ये Galaxy M10, Galaxy M20 आणि Galaxy M30 या स्मार्टफोनचा समावेश आहे. Galaxy M10 आणि Galaxy M20 हे स्मार्टफोन ओपन सेलमध्ये उपलब्ध आहेत, मात्र सॅमसंग Galaxy M30 स्मार्टफोन खऱेदी करण्यासाठी अद्यापही फ्लॅश सेलची वाट पहावी लागते. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल आणि अद्याप तुम्हाला ती संधी मिळाली नसेल तर आज तुमच्याकडे चांगली संधी आहे. कारण आज दुपारी 12 वाजेपासून या अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर या स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सही आहेत.

या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED इंफीनिटी U डिस्प्ले असून फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि अल्ट्रा वाइड लेंस आहे. मागील बाजूला असलेले तीन कॅमेरे 13MP + 5MP + 5MP कॉन्फिगरेनशचे आहेत. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. 4GB रॅम +64GB स्टोअरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 14,990 रुपये आहे. तर, 6GB रॅम +128 GB स्टोअरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 17 हजार 990 रुपये आहे. ऑफर्सबाबत सांगायचं झाल्यास या फोनच्या खरेदीवर रिलायंस जिओकडून डबल डेटाची ऑफर असून याद्वारे 3 हजार 110 रुपयांची बचत होऊ शकते, याशिवाय 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चा पर्यायही आहे.

फीचर्स –
डिस्प्ले – 6.4 इंच फुल HD+AMOLED इन्फिनिटी U डिस्प्ले
प्रोसेसर – ऑक्टाकोर Exynos 7904 प्रोसेसर
फ्रंट कॅमेरा – 16 मेगापिक्सल
रिअर कॅमेरा – 13 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल
रिजोल्युशन – 1080×2220 पिक्सल्स
ओएस- अँन्ड्रॉइड 8.1 ओरियो बेस्ड सॅमसंग एक्सपीरियंस 9.5 UI
बॅटरी – 5 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी (फास्ट चार्जिंगचा सपोर्ट)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 9:59 am

Web Title: samsung galaxy m30 go on sale
Next Stories
1 ‘गुगल’चा पुढाकार! ऑफिसमधील लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीसाठी नवी वेबसाइट
2 उन्हाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात
3 Honda ची ‘थ्री-व्हिलर’, वाचा काय आहेत फीचर्स
Just Now!
X