News Flash

शाओमीला टक्कर देण्यासाठी येतोय सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा फोन

जाणून घ्या फीचर्स आणि लाँचिंगची तारीख

मोबाईल कंपन्या कायमच स्पर्धक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नवनवीन मॉडेल्स लाँच करत असतात. त्याचुप्रमाणे शाओमीला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने जानेवारीच्या शेटवटच्या आठवड्यात आपली गॅलॅक्सी एम सिरीज लाँच केली होती. या सिरीजमधील एम १० आणि एम २० हे दोन फोन कंपनीने याआधी लाँच केले असून आता कंपनी आपला Samsung Galaxy M30 हा फोन लाँच करत आहे. हा फोन २७ फेब्रुवारी रोजी लाँच होणार असून तो शाओमीच्या रेडमी नोट ७ ला टक्कर देईल. शाओमीचा फोन २८ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या दोन फोनमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे.

एम सिरीजच्या माध्यमातून सॅमसंग शाओमीबरोबरच ऑनर, ओप्पो, यांसारख्या कंपन्यांनाही टक्कर देणार आहे. Samsung Galaxy M30 ची किंमत १५ हजार रुपयांपर्यंत असेल असे सांगण्यात आले आहे. जाणून घेऊयात या कंपनीचे फिचर्स…

स्क्रीन – ६.४ इंचाचा सुपर एमोलेड फुल एचडी

कॅमेरा – १३, ५ आणि ५ मेगापिक्सलचे ३ रियर कॅमेरा तसेच १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

रॅम – ६ जीबी

स्टोरेज – ६४ जीबी

प्रोसेसर – Exynos 7904

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 12:57 pm

Web Title: samsung galaxy m30 will launch on 27 february know feature and price
Next Stories
1 BSNL चा त्सुनामी प्लॅन, 98 रुपयात 2GB हाय-स्पीड डेटा
2 महिंद्राच्या ‘स्कॉर्पिओ’, ‘माराझो’वर आकर्षक डिस्काउंट
3 ‘पबजी’मध्ये झोम्बींची एन्ट्री, उद्यापासून ‘झोम्बी मोड’!    
Just Now!
X