सॅमसंग कंपनीनं आपल्या Galaxy M30s या फोनचं नवं व्हेरियंट भारतात लॉन्च केलं आहे. 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणारा स्मार्टफोन सॅमसंगने भारतात लॉन्च केलाय. यापूर्वी गॅलेक्सी एम30एस फक्त दोन व्हेरियंटमध्ये उपलबद्ध होते. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज या व्हेरिंटचा समावेश होता. या फोनची खासियत बॅटरी आणि ट्रपिल रिअर कॅमेरा आहे.

तब्बल ६,००० एमएएच क्षमतेची दर्जेदार बॅटरी असलेला सॅमसंग गॅलेक्सी ‘एम-30 एस’ हा एम मालिकेतील नवा स्मार्टफोन कंपनीने गेल्या वर्षाखेरीस लॉन्च केला होता. याच फोनचे नवीन व्हेरिंयट आज भारतीयांसाठी उपलबद्ध करण्यात आलं आहे. यापूर्वी लाँच केलेल्या एम३० या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे.

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत सुपर अॅमॉल्ड डिस्प्ले आणि एक्सनॉस ९६११ एसओसी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल क्षमतेचा आहे, तर ५ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलचे इतर दोन कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी यामध्ये १६ मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. ओपल ब्लॅक, सफायर ब्ल्यू आणि पर्ल व्हाइट अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलं आहे.

फीचर्स
– ६.४ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस ( २३४० बाय १०८० पिक्सल्स)
– सुपर अॅमोलेड आणि इन्फीनिटी-यू या प्रकारातील डिस्प्ले
– सॅमसंगचाच ऑक्टो-कोअर एक्झीनॉस ९६११ हा प्रोसेसर
– ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज तसेच ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज असे तीन व्हेरिअंटचे पर्याय
– किंमत – अनुक्रमे १३,९९९, १४,९९९ आणि १६,९९९ रूपये