तब्बल ६,००० एमएएच क्षमतेची दर्जेदार बॅटरी असलेला सॅमसंग गॅलेक्सी ‘एम-30 एस’ हा एम मालिकेतील नवा स्मार्टफोन कंपनीने लाँच केला आहे. यापूर्वी लाँच केलेल्या एम३० या मॉडेलची ही पुढील आवृत्ती आहे. या फोनच्या फीचरबाबत कंपनीने आधीच माहिती दिली होती. २९ सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणार असून यावर कंपनीचा वनयुआय हा युजर इंटरफेस दिलेला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचसोबत सुपर अॅमॉल्ड डिस्प्ले आणि एक्सनॉस ९६११ एसओसी प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी याच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल क्षमतेचा आहे, तर ५ मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सलचे इतर दोन कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी यामध्ये १६ मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा आहे. ओपल ब्लॅक, सफायर ब्ल्यू आणि पर्ल व्हाइट अशा तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आलं आहे.

Nokia 7.2 ची भारतात विक्री सुरू, 48MP चा कंपनीचा पहिलाच फोन

फीचर्स –
– ६.४ इंच आकारमानाचा, फुल एचडी प्लस ( २३४० बाय १०८० पिक्सल्स)
– सुपर अॅमोलेड आणि इन्फीनिटी-यू या प्रकारातील डिस्प्ले
– सॅमसंगचाच ऑक्टो-कोअर एक्झीनॉस ९६११ हा प्रोसेसर
– ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरिअंटचे पर्याय
किंमत – अनुक्रमे १३,९९९ आणि १९,९९९ रूपये