News Flash

Samsung Galaxy M31s भारतात झाला लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंगने भारतात लाँच केला 'मिड-रेंज सेगमेंट'मधला शानदार Galaxy M31s

दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने भारतात आपला ‘मिड-रेंज सेगमेंट’मधला नवीन स्मार्टफोन आज(दि.30) लाँच केला आहे. कंपनीने गॅलेक्सी एम सीरिजमध्ये Samsung Galaxy M31s हा फोन आणला आहे. या फोनमध्ये 64MP प्राइमरी कॅमेऱ्यासह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आणि 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. Samsung Galaxy M31s हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 6GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन उपलब्ध असेल. अ‍ॅमेझॉन इंडिया आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरुन Galaxy M31s खरेदी करता येईल. अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलदरम्यान म्हणजे 6 आणि 7 ऑगस्ट रोजी हा फोन पहिल्यांदा सेलमध्ये उपलब्ध केला जाईल.

फीचर्स :-
अँड्रॉइड-10 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित असलेल्या Galaxy M31s मध्ये Exynos 9611 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्राइमरी कॅमेरा 64 मेगापिक्सल क्षमतेचा असेल. कॅमेऱ्यासाठी ‘Intelli-Cam सिंगल टेक’ फीचर देण्यात आलं आहे. याद्वारे एकावेळेस अनेक फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करता येतात असं सांगितलं जात आहे. 64MP प्राइमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सल अल्ट्रा व्हिडिओ सेन्सर, 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स असा हा कॅमेऱ्यांचा सेटअप असेल. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP चा कॅमेराही देण्यात आला आहे. Samsung Galaxy M31s मध्ये फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाआहे. फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये होल-पंच कटआउट डिझाइन असेल. याशिवाय 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह तब्बल 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. पॉवरफुल बॅटरीमुळे 125 तासांचा म्युजिक प्ले-बॅक, 51 तासांचा कॉलिंग बॅकअप व 22 तासांचा ब्राउझिंग बॅकअप मिळतो, असा कंपनीचा दावा आहे. 8GB आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कंपनीने M सीरीजअंतर्गत Samsung Galaxy M30s आणि Samsung Galaxy M31 हे दोन फोन भारतीय बाजारात आणले आहेत.

किंमत :-
6GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला असून 19 हजार 499 रुपये आणि 21 हजार 499 रुपये इतकी अनुक्रमे किंमत ठेवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:57 pm

Web Title: samsung galaxy m31s launched in india with quad rear cameras 6000mah battery check price specifications sas 89
Next Stories
1 घरबसल्या करा बुलेटची सर्व्हिसिंग, Royal Enfield ने लाँच केली ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’
2 48MP कॅमेऱ्यासह 5,020mAh ची बॅटरी, Redmi Note 9 च्या खरेदीवर खास ऑफर
3 किंमत 10 हजारांहून कमी, Motorola च्या स्वस्त स्मार्टफोनचा आज ‘सेल’
Just Now!
X