सॅमसंग गॅलेक्सी एम40 हा स्मार्टफोन तुम्हाला आता ओपन सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. आतापर्यंत हा स्मार्टफोन Amazon इंडियाचं संकेतस्थळ आणि सॅमसंगच्या ऑनलाइन स्टोअरवर केवळ फ्लॅश सेलमध्येच उपलब्ध व्हायचा. फ्लॅश सेलअंतर्गत विविध कंपन्या मर्यादित स्टॉक विक्रीसाठी ठेवतात ते देखील वेगवेगळ्या तारखांना. त्यामुळे ग्राहकांना या फोनसाठी सेल केव्हा आयोजित होणार याची वाट पाहावी लागत होती, पण आता ओपन सेलमध्ये उपलब्ध झाल्यामुळे हा फोन ग्राहक केव्हाही खरेदी करु शकणार आहेत.

या फोनच्या खरेदीवर व्होडाफोनच्या ग्राहकांना 255 रुपयांच्या रिचार्जवर 3 हजार 750 रुपये कॅशबॅक, तर जिओच्या ग्राहकांना 198 आणि 299 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर अतिरिक्त इंटरनेटचा फायदा मिळेल. याशिवाय व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकांना 18 महिन्यांसाठी अतिरिक्त 0.5 जीबी डाटा मिळेल. तर, एअरटेलच्या ग्राहकांसाठी 10 महिन्यांपर्यंत 100 टक्के अतिरिक्त डाटा आहे. यात ‘स्क्रीन साउंड’ तंत्रज्ञान आहे. स्क्रीन साउंड तंत्रज्ञान असणारा हा या मालिकेतील पहिलाच स्मार्टफोन आहे.

या स्मार्टफोनमध्ये फुल-एचडी+ इनफिनिटी ओ डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील एक कॅमेरा 32 MP, दुसरा कॅमेरा 5MP आणि अल्ट्रा-वाइड-एंगल लेंस असलेला 8MP चा तिसरा कॅमेरा आहे. कॅमेऱ्यामध्ये 4K रेकॉर्डिंग, स्लो-मोशन आणि हायपरलॅप्सचा सपोर्ट देखील आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Galaxy M40 ची इंटर्नल मेमरी 128GB असून मेमरी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi, ब्ल्यु-टूथ, GPS/ A-GPS आणि USB टाइप-C सपोर्ट आहे. ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर आहे. फिंगरप्रिंट स्कॅनर फोनच्या मागील बाजूला देण्यात आलं आहे. यामध्ये 3,500mAh ची बॅटरी आहे, फास्ट चार्जिंगसाठी यामध्ये 15W फास्ट-चार्जिंगचा सपोर्ट आहे. Galaxy M40 ची भारतीय बाजारात Realme आणि Xiaomi यांसारख्या कंपन्यांशी स्पर्धा असणार आहे.