प्रमुख स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने 28 एप्रिल रोजीच आपला लेटेस्ट मिडरेंज 5जी स्मार्टफोन Samsung Galaxy M42 5G  भारतात लाँच केला असून आता या फोनची विक्री सुरू झाली आहे. 30 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपासूनच हा फोन सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे. Samsung Galaxy M42 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर असून यात 48 मेगापिक्सेलच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. कंपनीने सुरक्षेसाठी यामध्ये इनहाउस Knox सिक्युरिटी फिचरही दिलं आहे. शिवाय 5,000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी असलेल्या या फोनमध्ये सुपर एमोलेड डिस्प्ले आणि वॉटरड्रॉप नॉच स्टाइल आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये कॉन्टेक्टलेस Samsung Pay साठी एनएफसी सपोर्टची सुविधाही मिळेल.

Samsung Galaxy M42 5G स्पेसिफिकेशन्स :-
नवीन 5G स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित One UI 3.1 चा सपोर्ट असून यात 6.6 इंचाचा HD+ सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर, 8 जीबीपर्यंत रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. शिवाय मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येणंही शक्य आहे. फोटोग्राफीसाठी कंपनीने फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप दिला आहे. त्यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा असून 48MP+8MP+5MP+5MP असा सेटअप आहे. तर, सेल्फीसाठी पुढील बाजूला 20 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कॅमेऱ्यासोबत सिंगल टेक, नाइट मोड, हायपरलॅप्स, सुपर स्लो मोशन, सीन ऑप्टिमायजर आणि फ्लो डिटेक्शन यांसारखे फिचर्स मिळतील. याशिवाय कंपनीने नवीन 5G स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. याद्वारे 34 तासांचा व्हिडिओ प्ले बॅकअप मिळतो असा कंपनीचा दावा आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी यात 5जी, 4जी, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस यांसारखे फिचर्सही आहेत.

Samsung Galaxy M42 5G ची किंमत :-
Samsung Galaxy M42 5G च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 21 हजार 999 रुपये आहे. तर, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 23 हजार 999 रुपये आहे. लाँचिंग ऑफरअंतर्गत 6 जीबी रॅम मॉडेल 19 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम मॉडेल 21 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन प्रिझ्म डॉट ब्लॅक आणि प्रिझ्म डॉट ग्रे अशा दोन कलरमध्ये खरेदी करता येईल.