27 September 2020

News Flash

Samsung च्या ‘या’ फोनवर ₹5000 कॅशबॅकची ऑफर, मिळतील शानदार फीचर्स

13 जूनपासून ऑफर सुरू झाली असून 6 ऑगस्ट 2020 पर्यंत घेता येईल लाभ ...

(Image: Nandagopal Rajan/ Indian Express)

शानदार फीचर्स असलेला सॅमसंगचा Galaxy Note 10 Lite खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. या स्मार्टफोनवर 5000 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. लाँचिंगवेळी या फोनच्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये आणि टॉप व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये होती. पण आता कॅशबॅक ऑफरमुळे हा फोन 34,999 रुपयांच्या बेसिक किंमतीमध्ये खरेदी करता येईल.

काय आहे ऑफर
सध्या अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर ‘गॅलेक्सी नोट 10 लाइट’च्या 6 जीबी रॅम मॉडेलची किंमत लाँचिंगवेळी ठेवलेल्या किंमतीपेक्षा एक हजार रुपये जास्त म्हणजे 39,999 रुपये इतकी आहे. पण, 5000 रुपयांच्या कॅशबॅकमुळे हे व्हेरिअंट 34,999 रुपये आणि टॉप व्हेरिअंट 36,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. पण ही कॅशबॅकची ऑफर फक्त Citibank क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांसाठीच आहे. ही ऑफर 13 जून 2020 ते 6 ऑगस्ट 2020 या कालावधीत मिळेल.

काय आहे नोट 10 लाइटची खासियत
‘नोट 10’ या स्मार्टफोनप्रमाणे नोट 10 लाइटमध्येही कंपनीने S Pen दिले आहे. यामुळे हा फोन अन्य फोनपेक्षा जरा वेगळा ठरतो. फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल-HD+ (1080×2400 पिक्सल) सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन Exynos 9810 प्रोसेसर आणि 128 जीबीपर्यंतच्या स्टोरेजसह येतो. तसेच फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप, तर सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. ट्रिपल रिअर कॅमेऱ्यामध्ये 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल लेंस आणि 12 मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 4,500mAh क्षमतेची बॅटरी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 1:59 pm

Web Title: samsung galaxy note 10 lite now available for an effective price of rs 34999 flat rs 5000 cashback get details sas 89
Next Stories
1 Samsung Galaxy A21s भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2 लॉकडाउनदरम्यानही अ‍ॅमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या संपत्तीत ४० अब्ज डॉलर्सची वाढ
3 Mi Notebook सीरिजच्या दोन्ही लॅपटॉपचा आज पहिला ‘सेल’, जाणून घ्या किंमत आणि ऑफर
Just Now!
X