दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतात आपले दोन नोट सीरिजमधील दोन स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लाँच केले आहेत. कंपनीने या दोन्ही स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी बेंगळुरूमध्ये एका इव्हेंटचं आयोजन केलं होतं. नोट 10 सीरीजचे हे दोन्ही स्मार्टफोन सर्वप्रथम न्यू यॉर्कमध्ये लाँच केले होते. या फोनसाठी कंपनीने आगाऊ नोंदणीही सुरू केली आहे. आगाऊ नोंदणी करणाऱ्यांसाठी कंपनीकडून काही खास आकर्षक ऑफर्स देखील आहेत. 23 ऑगस्टपासून या फोन्सची विक्री सुरू होईल. सॅमसंग, फ्लिपकार्ट, अॅमेझॉनच्या संकेतस्थळांवरुन फोन खरेदी करता येईल.

फीचर्स – 

या दोन्ही स्मार्टफोनमधील बहुतांश फिचर्स सारखेच असून थोडाफार फरक हा डिस्प्लेचा आकार व क्षमता तसेच कॅमेर्‍यांमध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 हे मॉडल 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. तर, सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस हे मॉडल 12 जीबी रॅम+256 जीबी स्टोरेज तसेच 12 जीबी रॅम+512 जीबी स्टोरेजच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आलेत.  हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून ऑक्टा-कोर Exynos 9825 प्रोसेसर यात देण्यात आलं आहे. या दोन्ही मॉडल्समध्ये इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर व फेस अनलॉक फिचर्स  आहेत.  Galaxy Note 10 या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सल्सचा असून याला 12 आणि 16 मेगापिक्सल्सच्या अन्य दोन कॅमेर्‍यांची जोड आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 प्लस या मॉडलमध्ये या तिन्ही कॅमेर्‍यांना व्हीजीए क्षमतेचा अजून एक कॅमेरा जोडण्यात आलाय. या मॉडलच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 10 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे. यातील Note 10 मध्ये 3,500mAh क्षमतेची आणि Note 10+ मध्ये 4300 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 मध्ये 6.3 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डायनॅमिक अमोलेड इन्फीनिटी ओ डिस्प्ले आहे, तर नोट 10 प्लसमध्ये 6.8 इंचाचा व क्युएचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. हे दोन्ही डिस्प्ले एचडीआर 10 प्लस या मानकानुसार तयार करण्यात आलेत. त्यामुळे अतिशय उच्च दर्जाच्या प्रतिमा व व्हिडीओचा अनुभव घेता येऊ शकतो. याशिवाय यामध्ये पंच होलप्रमाणे वरील कोपऱ्यावर नव्हे तर मध्यभागी फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

किंमत – 

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10(8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज) 69 हजार 999 रुपये

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10+(12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज) 79,999 रूपये आणि 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज व्हेरियंट – 89 हजार 999 रूपये.