News Flash

‘ही’ आहेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ ची वैशिष्ट्ये

इतर कंपन्यांना टक्कर

‘ही’ आहेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ ची वैशिष्ट्ये
सॅमसंग गॅलॅक्सी नोट ८

सध्या आपली नवनवीन मॉडेल्स बाजारात लाँच करण्यासाठी मोबाईल कंपन्यांची भलतीच चढाओढ चालू असलेली आपल्याला दिसते. मोबाईलच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सॅमसंगनेही आपले नवीन मॉडेल बाजारात आणणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. मोबाईल ग्राहकांसाठी बााजारात नव्याने येणाऱ्या मॉडेलमध्ये काय सुविधा असतील हे पाहणे कायमच उत्सुकतेचा विषय असतो. त्यामुळे सॅमसंगच्या नव्या मॉडेलमध्ये कोणती फिचर्स मिळणार आहेत याबाबतही सहाजिकच उत्सुकता आहे. पाहूयात काय आहेत सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या नव्या मॉडेलमधील फिचर्स…

या फोनमध्ये तब्बल ६ जीबी ‘रॅम’ असेल असे बोलले जात आहे. या हॅंडसेटला ६.३० इंचाचा डिसप्ले असेल. नव्या स्मार्टफोनमध्ये एक्झोनस ८८९५ मोबाईल प्रोसेसर आणि ६ जीबी ‘रॅम’ आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ मध्ये अँड्रॉईडची ७.१.१ ही आवृत्ती असेल. मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर आहे. ३३०० मिली अँपअवर (mHA) इतकी बॅटरीची क्षमता आहे. मोबाईलमध्ये ६४ जीबी इंटर्नल स्टोअरेज असेल. या फोनमध्ये नॅनो सिम चालू शकेल. भारतात हा फोन ३ जीला सपोर्ट करेल असे सांगण्यात आले आहे.

याशिवाय, वायरलेस चार्जिंगची सुविधा मोबाईलमध्ये आहे. १२ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा या मोबाईलमध्ये आहे. युरोपियन बाजारपेठेत मोबाईलची किंमत सुमारे ७५ हजार रूपये असणार आहे. मात्र भारतात तो किती रुपयांना आणि कधी उपलब्ध होईल हे कंपनीकडून अद्याप स्पष्ट कऱण्यात आलेले नाही. यामध्ये काळा, निळा, गोल्डन आणि सिल्व्हर असे चार रंग उपलब्ध असणार आहेत. गॅलक्सी एस ८ या फोनचे फीचर्स नुकतेच लीक झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2017 12:45 pm

Web Title: samsung galaxy note 8 new launch features
Next Stories
1 ‘अशी’ साजरी करा कृष्णाष्टमी
2 ‘या’ वेळेला केलेली कृष्णाची पूजा ठरु शकते लाभदायक
3 कमी वेतनावर काम करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या
Just Now!
X