दक्षिण कोरीयाची कंपनी असलेली कंपनी २०१९ या नवीन वर्षात आपली अनेक मॉडेल्स लाँच करणार असल्याचे कंपनीने सांगितले होते. कंपनी आपल्या Galaxy M-series चे स्मार्टफोन लाँच करणार आहे. तर प्रिमियम Galaxy S10 हा फोनही लवकरच बाजारात आणणार असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर कंपनी लवकरच आपला फोल्डेबल स्मार्टफोनही बाजारात आणणार आहे. आज कंपनीने आपल्या या फोनचा लूक जाहीर केला. कंपनीने मागील वर्षी झालेल्या एका परिषदेत या फोनचे प्रदर्शन केले होते. या फोल्डेबल फोनला Galaxy F सिरीजच्या नावाने लाँच करणार असल्याचे बोलले जात आहे. हा फोल्डेबल फोन लाँच होण्यासाठी आणखी काही काळ लागेल असे कंपनीने सांगितले आहे.

सॅमसंगच्या या फोल्डेबल फोनला बाजारातील इतर कंपन्या टक्कर देण्याची शक्यता आहे. या फोनला असणाऱ्या २ बॅटरी २२०० मिलिअॅम्पियर्सच्या असतील असे म्हटले जात आहे. पण या आधी ही बॅटरी ६२०० मिलिअॅम्पियर्सची असेल अशीही चर्चा होती. या फोनची एक स्क्रीन आतल्या बाजूला तर दुसरी बाहेरच्या बाजूला असेल. या फोनच्या किंमतींबाबत बऱ्याच अफवा पसरत असून अजून त्याची नेमकी किंमत समोर आलेली नाही. सॅमसंगसोबतच इतरही अनेक कंपन्या येत्या काळात अशाप्रकारचा फोल्डेबल स्मार्टफोन बनवण्याची शक्यता आहे.