15 August 2020

News Flash

Samsung चा नवा फोल्डेबल फोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

आधीच्या गॅलेक्सी फोल्डपेक्षा नवा Galaxy Z Flip बराच वेगळा

Samsung कंपनीने आपला नवीन फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Flip लाँच केला आहे. सॅन फ्रँसिस्कोमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये कंपनीने हा फोन लाँच केला. आधीच्या गॅलेक्सी फोल्डपेक्षा नवा Galaxy Z Flip बराच वेगळा आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा फोन सॅमसंगच्या खास ‘अल्ट्रा-थिन ग्लास’सोबत येईल.

Galaxy Z Flip स्पेसिफिकेशन्स –
या फोल्डेबल फोनमध्ये 6.7 इंच फुल एचडी+ डायनॅमिक AMOLED इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आहे. फोनमध्ये दिलेला छोटा सेकंडरी कव्हर डिस्प्ले 1.06 इंचाचा आहे. फोनचा मुख्य डिस्प्ले पंच-होल डिझाइनसह येतो. यामध्ये 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. बाहेरच्या बाजूला 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 12 मेगापिक्सल वाइड-अँगल प्रायमरी कॅमेरा आहे. कॅमेऱ्यात OIS सपोर्ट आणि 8X डिजिटल झूमचा सपोर्ट आहे. व्हिडिओ शुटिंग किंवा फोटोग्राफी करताना हा फोन 90 अंशापर्यंत वळतो. याशिवाय सेल्फीसाठी 10 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित OneUI सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर आहे. 8 जीबी रॅमचा पर्याय असलेल्या या फोनमध्ये 3,300mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

आणखी वाचा (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी) 

आणखी वाचा – (Vodafone ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर मिळवा ₹2500 कॅशबॅक)

किंमत –
आधीच्या फोल्डेबल फोनपेक्षा Galaxy Z Flip थोडा स्वस्त आहे. सॅमसंगने हा फोन 1,380 डॉलरच्या (जवळपास 98,400 रुपये) किंमतीसह लाँच केलाय. निवडक देशांतील मार्केटमध्ये हा फोन 14 फेब्रुवारीपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल. पण भारतात हा फोन कधीपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 3:55 pm

Web Title: samsung galaxy z flip foldable phone launched know price specifications and features sas 89
Next Stories
1 पुणे-शिर्डी हेलीकॉप्टर सेवा; ५० मिनिटांमध्ये साईबाबांच्या चरणी
2 येतेय Nissan ची नवी SUV ; मारुती Brezza, Hyundai Venue ला देणार टक्कर
3 स्वस्तात खरेदी करा Realme चा 64MP, पाच कॅमेऱ्यांचा फोन; ऑफर उद्यापर्यंतच
Just Now!
X