News Flash

Xiaomi चा Apple ला धोबीपछाड; ठरली तिसऱ्या क्रमांकांची सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी

सॅमसंग पहिल्या क्रमांकावर कायम

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशननं (IDC) या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहितील स्मार्टफोन शिपमेंटशी निगडीत आपला अहवाल सादर केला आहे. २०२० च्या अहवलातून सॅमसंगनं आपला पहिला क्रमांक कायम ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. २०२० च्या तिसऱ्या तिमाहित गेल्या वर्षाच्या तुलनेत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये १.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. दरम्यान, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. परंतु ही आकडेवारी चांगली असल्याचं जाणकारांचं मत आहे. दरम्यान, शाओमी या कंपनीनं अॅपलला धोबीपछाड देत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली असल्याचंही याद्वारे समोर आलं आहे.

यावर्षी जुलै ते सप्टेंबरदरम्यान तिसऱ्या तिमाहित ३५३.६ दहशलक्ष स्मार्टफोन शिप करण्यात आले. यापूर्वी आयडीसीनं ९ टक्क्यांची घसरम होणार असल्याचा अंदाज आयडीसीनं व्यक्त केला होता. परंतु समोर आलेली आकडेवारी ही अपेक्षेपेक्षा उत्तम असल्याचं म्हटलं जात आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार सॅमसंग २२.७ टक्के मार्केट शेअरसह पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीनं २०२० च्या तिसऱ्या तिमाहित ८०.४ दशलक्ष युनिट शिप केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीनं २.९ टक्के अधिक युनिट बाजारात उपलब्ध केले होते.

५१.९ दशलक्ष युनिट्सच्या शिपिंगसह हुआवेचा १४.७ टक्के मार्केट शेअर होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत हुआवे या चिनी कंपनीच्या शिपमेंटमध्ये २२ टक्क्यांची घसरण झाली. तर दुसरीकडे शाओमीनं झेप घेत अॅपलला मागे टाकलं आहे. शाओमीनं ४६.५ दशलक्ष युनिट बाजारात उपलब्ध करत १३.१ टक्के मार्केट शेअरवर कब्जा केला. यात एकूण ४२ टक्के वाढ दिसून आली. कमी किंमतीच्या आणि मीड रेंज स्मार्टफोनच्या मागणीत मोठी वाढ पाहायला मिळाली. भारत आणि अन्य विकसनशील देशांमध्ये ही मागणी अधिक होती. अॅपल आणि विवोनं अनुक्रमे ११.८ आणि ८.९ मार्केट शेअरसह चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 7:33 pm

Web Title: samsung regains top smartphone vendor spot as xiaomi overtakes apple jud 87
Next Stories
1 Airtel ची अनोखी ऑफर; स्मार्टफोन खरेदीसाठी देणार लोन
2 आजपासून भारतातील जुन्या युजर्ससाठी देखील होणार PUBG बंद!
3 जाणून घ्या कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व…
Just Now!
X