News Flash

Samsung ची भन्नाट ऑफर, TV खरेदीवर 77 हजारापर्यंतचा स्मार्टफोन Free

प्रजासत्ताक दिनानिमित्त सॅमसंगचा आकर्षक सेल

प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दक्षिण कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगने अनेक शानदार ऑफर्स आणल्या आहेत. सॅमसंग आपले टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, फ्रिज आणि माइक्रोव्हेव यांसारख्या उत्पानदनांच्या खरेदीवर 15 टक्के कॅशबॅक, इएमआय आणि झिरो डाउन पेमेंट यांसारख्या ऑफर देत आहे. याशिवाय कंपनीने सॅमसंग QLED किंवा 4K UHD टीव्ही खरेदी करणाऱ्यांना निश्चित भेट देण्याचा निर्णय घेतलाय. सॅमसंग टीव्ही खरेदी केल्यास ग्राहकांना 76 हजार 900 रुपयांपर्यंतचा स्मार्टफोन मोफत मिळू शकतो.

या ऑफरमध्ये ग्राहकांना Samsung QLED आणि 4K UHD टीव्हीचे निवडक मॉडेल्स खरेदी केल्यास 76 हजार 900 रुपयांचा गॅलेक्सी S10 (512 जीबी), 19 हजार 999 रुपयांचा गॅलेक्सी A50s (4जीबी), 16,999 रुपयांचा गॅलेक्सी M30 (6जीबी), 8 हजार 499 रुपयांचा गॅलेक्सी A10s आणि 3 हजार 799 रुपयांचा सॅमसंग U Flex हेडफोन यांसारखे निश्चित गिफ्ट्स दिले जात आहेत.

गिफ्टशिवाय कंपनी 30 दिवस Zee5 सब्सक्रिप्शनही मोफत देत आहे. सॅमसंगचा हा सेल कंपनीच्या अधिकृत स्टोअर्समध्ये सुरू आहे. याशिवाय कंपनीने ‘माय सॅमसंग माय इएमआय सर्व्हिस’ची सुविधाही आणली आहे. या सेवेनुसार ग्राहक आपल्या बजेटनुसार इएमआय आणि डाउन पेमेंट ठरवू शकतात. कंपनी 31 जानेवारीपर्यंत निवडक मॉडेल्सवर दोन वर्षांची वॉरंटी आणि 10 वर्ष स्क्रीन बर्न-इन वॉरंटीही देत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2020 2:03 pm

Web Title: samsung republic day offer free galaxy s10 with selected qled 4k tvs sas 89
Next Stories
1 Video: पुरणपोळी, मोदक, गुलाबजाम आइस्क्रीम्सची ‘पेशवाई थाळी’
2 Hero च्या स्वस्त इ-स्कुटरवर भरघोस डिस्काउंट, Paytm चीही भन्नाट ऑफर
3 डिझायर आणि होंडा अमेझला टक्कर, आज लाँच होणार Hyundai Aura
Just Now!
X