22 October 2020

News Flash

Samsung चा सर्वात मोठा सेल, या स्मार्टफोन्ससह अनेक प्रॉडक्टवर मोठ्या ऑफर

#RewardYourself

फेस्टिव सीजनला सुरुवात झाली असून विविध कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर्स देत आहेत. अशातच आता सॅमसंगचा खास फेस्टिव प्रोग्राम #RewardYourself ला सुरुवात झाली आहे. या ऑफर्ससह कंपनी ग्राहकांना गॅलेक्सी डिव्हायसेसला खरेदी करणं आणखी सोपं करत आहे.  रिवॉर्ड योरसेल्फ स्कीमसह एचडीएफसी क्रेडिट कार्डसह एसबीआयच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यानंतर अतिरिक्त दहा टक्केंचा कॅशबॅक मिळणार आहे. जाणून घेऊयात या खास डीलबाबत…

एचडीएफसी बँकेच्या कार्डवर १० टक्केंचा कॅशबॅक –
४,९९९ रुपयांपासून १,०४,९९९ रुपयांपर्यंतच्या काही निवडक स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, आणि वियरेबल्सच्या खरेदीवर ही खास ऑफऱ देण्यात आली आहे. १५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान या ऑफर्ससह तुम्ही सॅमसंग डिव्हायस खरेदी करु शकता.

एसबीआय बँकेच्या कार्डवर १० टक्केंचा कॅशबॅक –
४,९९९ रुपयांपासून ४७, ९९९ रुपयांपर्यंत तुम्ही सर्व गॅलक्सी स्मार्टफोन्स आणि काही निवडक टॅबलेट आणि वियरेबल्सच्या खरेदीवर ही खास ऑफऱ देण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर दरम्यान या ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

इंस्टंट कॅशबॅक
16 से 25 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या ऑफरमध्ये गॅलेक्सी नोट २० च्या खरेदीवर १० हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.

झिरो डाउन पेमेंटसोबत नो-कॉस्ट ईएमआय –
ही ऑफर सर्व गॅलेक्सी A सिरिज आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन्ससाठी आहे. या ऑफर्सनुसार, ग्राहक आपल्या आवडीचा गॅलक्सी स्मार्टफोन झिरो डाउन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि इंटरेस्टवर खरेदी करु शकतात.

अपग्रेड ऑफर –
१६ ते २५ ऑक्टोबरपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये युजर्सला गॅलेक्सी नोट २० अल्ट्राच्या खरेदीवर १३ हजार रुपयापर्यंतचा अपग्रेड बोनस आणि सात हजार रुपयांचा सॅमसंग व्हावचर मिळणार आहे.

टॅबलेटच्या कीबोर्ड कव्हरच्या खरेदीवर १० हजार रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत गॅलेक्सी टॅब एस ७ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कीबोर्ड कव्हरवर दहा हजार रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे.

गॅलेक्सी स्मार्टवॉचवर गॅलेक्सी बड्स+ फ्री
रिवॉर्ड योरसेल्फ ऑफरमध्ये कंपनी गॅलेक्सी स्मार्टवॉचसह ३,९९९ रुपयांचा गॅलेक्सी बड्स+ फ्री देत आहे. सोबतच१५ ऑक्टोबरपासून १७ नोव्हेंपरपर्यंतच्या खरेदीवर सर्व प्रमुख बँकेच्या क्रेडिट कार्ड्सवर दहा टक्केंची सूट देण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 9:13 am

Web Title: samsung reward yourself programme offering best festive deals on smartphones nck 90
Next Stories
1 Flipkart Big Billion Day ला सुरुवात, जाणून घ्या ऑफर्स आणि काय काय खरेदी करण्याची आहे संधी
2 गाढ झोप करोनापासून बचाव करते का? डॉक्टर सांगतात…
3 ‘हॅचबॅक’ला पर्याय नॅनो एसयूव्ही
Just Now!
X