दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग लवकरच नवीन फोल्डेबल फोन लाँच करणार आहे. एका लेटेस्ट रिपोर्टनुसार, कंपनीच्या या नवीन फोनचं नाव सॅमसंग Galaxy Z Fold 2 असण्याची शक्यता आहे. या नावामुळे कंपनी आपले सर्व फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z लाइनअपमध्येच उतरवेल अशी चर्चा आहे.

कंपनी हा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन 5 ऑगस्ट रोजी एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये लाँच करण्याची शक्यता आहे. SamMobile च्या रिपोर्टनुसार कंपनी या इव्हेंटमध्ये गॅलेक्सी झेड फोल्ड 2 या फोनसोबतच गॅलेक्सी नोट 20 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप फोन 5जी मॉडेलमध्ये लाँच करेल.

Galaxy Z Fold 2 या नवीन फोल्डेबल फोनमध्ये कोणते फीचर्स असतील याबबात अद्याप माहिती मिळालेली नाही. पण पूर्वीपासून बाजारात असलेल्या गॅलेक्सी फोल्डपेक्षा यात आधीपेक्षा चांगला कॅमेरा, मोठी बॅटरी देण्याची शक्यता आहे. तसेच या फोनसाठी पंच-होल डिझाइनसह इन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. हा फोन वॉटरप्रूफ असू शकतो. या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबाबत अजून माहिती मिळालेली नाही पण बहुतांश फीचर्स गॅलेक्सी फोल्डप्रमाणेच असू शकतात.

Galaxy Fold चे फीचर्स :- सॅमसंगचा पहिला फोल्डेबल फोन Galaxy Fold मध्ये 7.3 इंचाचा टॅबलेट साइज फ्लेक्सिबल डिस्प्ले आहे. फोल्ड केल्यानंतर मेन स्क्रीन 4.64 इंचाची होते. फोनमध्ये 12जीबी रॅम, 512जीबी स्टोरेज आणि स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर असून यात दोन बॅटरी देण्यात आल्या आहेत. एकूण सहा कॅमेरे असलेल्या या फोनची किंमत 1,73,999 रुपये आहे.