सत्तू’ची बर्फी

सामग्री:

२५० ग्रॅम सत्तू

१ टीस्पून देसी तूप

१५० ग्रॅम किसलेले गूळ

आवश्यक पाणी

४-५ वाळलेल्या अंजीराचे तुकडे

½ टिस्पून वेलची पावडर

½ टीस्पून दालचिनी पावडर

१०० ग्रॅम मिश्रित ड्राय फ्रूट्स

बनवण्याची प्रक्रिया

१. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे. त्यात सत्तू घाला आणि २-३ मिनिटे भाजून घ्या. बाजूला ठेवून द्या.

२. पाण्यात किसलेले गूळ घाला आणि उकळून घ्या.

३. त्याच पाण्यात चिरलेली अंजीर घाला. मध्यम आचेवर ३-४ मिनिटे शिजवा.

४. या पाण्यात भाजलेला सत्तू घालून मिक्स करून घ्या.

५. एका थाळी मध्ये मिश्रण समान प्रमाणात पसरवा. वर चिरलेली कोरडे फळे घाला आणि त्यावर आयतकार आकारामध्ये चिरून घ्या. अशा प्रकारे तुमच्या सत्तूची बर्फी होईल तयार.

(शेफ: निरंजन गद्रे, व्याख्याता, आयटीएम आयएचएम नेरूळ, नवी मुंबई )