19 November 2019

News Flash

SBI Alert : लाखो पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, 30 नोव्हेंबरपर्यंत करा ‘हे’ काम

अन्यथा पेन्शनधारक बँक खात्यातून पेन्शन काढू शकणार नाहीत किंवा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. पेन्शनधारकांना ज्यांचे निवृत्ती वेतन एसबीआयच्या खात्यात जमा होते अशांना 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत आपलं लाइफ सर्टिफिकेट(जिवंत असल्याचं प्रमाणपत्र) जमा करण्यास बँकेकडून सांगण्यात आलं आहे.

एसबीआयच्या कोणत्याही शाखेत हे लाइफ सर्टिफिकेट किंवा जिवंत असल्याचं प्रमाणपत्र जमा केले जाऊ शकते. तसेच, जवळच्या आधार सेंटर आणि कॉमन सर्विस सेंटरवर हे जमा करता येईल. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात पेंशनरला आपल्या बँकेत जाऊन रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करुन आपण जिवंत असल्याचे प्रमाण द्यावे लागते. जर हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर पेन्शनधारक आपल्या बँक खात्यातून पेन्शन काढू शकणार नाहीत किंवा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल असं एसबीआयकडून ट्विटरद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे.


पर्याय –
जे पेन्शनर बँकेत येऊ शकत नाहीत ते एखाद्या मॅजिस्ट्रेट किंवा गॅजेट ऑफिसरकडून स्वाक्षरी घेऊन आपले प्रमाणपत्र जमा करु शकतात.

जर पेन्शनर स्वत: बँकेत जाऊ शकतं नसेल तर अधिकृत व्यक्ती बँकेत पाठवू शकतात, बँक अधिकारी लाइफ सर्टिफिकेटची पावती स्वीकारतील.

First Published on November 3, 2019 2:46 pm

Web Title: sbi alert issue advisory to complete life certificate for pensioners sas 89
Just Now!
X