‘एसबीआय कार्ड’ने ग्राहकांच्या सोयीसाठी ‘व्हिडिओ KYC'(know your customer) ची सुरुवात केली आहे. या सेवेला ‘व्हीकेवायसी’(VKYC) नाव देण्यात आले आहे असून याद्वारे घरी बसून डिजिटल पद्धतीने केवायसी प्रक्रिया करता येईल. तुम्हाला यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. ‘एसबीआय कार्ड’ने ही सेवा सुरू केली आहे. ‘एसबीआय कार्ड’ ही क्रेडिट कार्ड जारी करणारी देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक कंपनीच्या रुपात काम करते.

VKYC मुळे फसवणूक रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल, तसेच केवायसी प्रक्रियेसाठी लागणारा वेळही निम्मा होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं. याद्वारे कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटता केवायसी प्रक्रिया डि​जिटल पद्धतीने पूर्ण करता येईल. व्हिडिओ केवायसीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, जिओ टॅगिंग, रि​कग्निशन, डायनॅमिक व्हेरिफिकेशन कोड, लाइव्ह फोटो कॅप्चर फेशियल रि​कग्निशन यासारख्या टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ग्राहकांना झीरो कॉन्टॅक्ट आणि कुठल्याही अडचणी शिवाय बँक फॅसिलिटी देता यावी हा प्रयत्न असल्याचं कंपनीने सांगितलं. जाणून घेऊया ही प्रक्रिया :-

-सर्वप्रथम ग्राहकांना एसबीआय कार्डच्या वेबसाइटवर अर्ज भरावा लागेल

-व्हीकेवायसीसाठी ग्राहकाची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर व्हीकेवायसीसाठी ग्राहकांना एक लिंक पाठवली जाते.

-लिंकद्वारे ग्राहकांना सर्व तपशील- नाव, जन्म तारीख, पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्डची एक्‍सएमएल कॉपी अपलोड करावी लागेल.

-यानंतर एसबीआय कार्ड अधिकाऱ्यासोबत डायनॅमिक व्हेरिफिकेशन कोडद्वारे फेस टू फेस व्हिडिओ कॉल केला जातो. यावेळी डिजिटल पद्धतीने कागदपत्रांची पडताळणी केली जाते.

-सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर VKYC प्रक्रिया पूर्ण होते.