देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदासाठी आठ हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. शुक्रवारपासून अर्थात ३ जानेवारीपासून भरतीची ऑनलाइन प्रक्रीय सुरू झालीये. २६ जानेवारी २०२० ही अर्ज करण्याची अखेरची तारीख असून कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
देशभरात एकूण ८ हजार जागा भरल्या जाणार आहेत. बँकेतील कस्टमर सपोर्ट व सेल्स विभागासाठी कनिष्ठ सहाय्यक या पदांसाठी ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/careers या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करता येईल. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येईल. यात महाराष्ट्रातून सर्वाधिक ८६५ जागा भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातून देखील ८६५ जागा भरल्या जातील. त्या खालोखाल मध्य प्रदेश ५१०, छत्तीसगड १९०, दिल्ली १४३, राजस्थान ५००, बिहार २३०, झारखंडमध्ये ४५ व अन्य राज्यांतील रिक्त जागांसाठी भरती होत आहे.
कोण करु शकतं अर्ज ?
-अर्जदाराचं किमान वय २० पूर्ण असावं. तर, कमाल वय २८ वर्षे असावं
-कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो.
-पात्रतेचे निकष उमेदवारानं १ जानेवारी २०२० पूर्वी पूर्ण केलेले असावेत.
-एससी, एसटी उमेदवारांसाठी वयाची अट ५ वर्षांनी तर, ओबीसींसाठी तीन वर्षांनी शिथील
-प्राथमिक परीक्षा – फेब्रुवारी/मार्च २०२० मध्ये
-मुख्य परीक्षा – १९ एप्रिल २०२० रोजी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 3:32 pm