01 June 2020

News Flash

SBI च्या कोट्यवधी खातेदारांना झटका, एक नोव्हेंबरपासून ‘हा’ महत्त्वाचा बदल

हा महत्त्वाचा बदल एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी SBI च्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.

व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे. परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 11:53 am

Web Title: sbi to reduce interest rates for savings accounts from november 1 sas 89
Next Stories
1 ‘तेजस’ला उशीर, प्रवाशांना पहिल्यांदाच मिळणार ‘इतकी’ भरपाई
2 डोक्यात कार्डबोर्ड बॉक्स घालून विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
3 मुलीच्या दिरासोबत लग्न करण्यासाठी दिला नवऱ्याला घटस्फोट
Just Now!
X