BHIM अॅप वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. BHIM अॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये वन-टाईम मेंटेड फिचर जोडण्यात आले आहे. या नव्या फिचरचा वापर करून युझर्सना त्यांचे पेमेंट शेड्युल करता येईल. जर आपल्याला 15 तारखेला पैसे भरायचे असतील तर त्यापूर्वी कधीही हे पेमेंट शेड्युल करून ठेवता येऊ शकते. परंतु पेमेंट होईपर्यंत हे पैसे अकाऊंटमध्ये ब्लॉक होणार आहेत. तसेच हे पैसे ब्लॉक झाले असले तरी यावर व्याज बँकांकडून मिळणारे व्याज देण्यात येणार आहे.

मोबाइल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी स्मार्टफोन आणि इंटरनेट आवश्यक असल्याचा विचार सर्वच करत असतात. परंतु आता जाणून घेऊया इंटरनेटशिवाय पैसे कसे ट्रान्सफर करता येतील.

यासाठी सर्वप्रथम यूएसएसडी (USSD) आधारित मोबाइल बँकिंगचा वापर करावा लागेल.

BHIM अॅपबरोबरच USSD प्लॅटफॉर्मदेखील अपग्रेड करण्यात आला आहे.

यानंतर BHIM अॅपवर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच एकदा सिमकार्ड आणि स्मार्टफोन आपल्या बँक अकाऊंटशी जोडल्यानंतर BHIM अॅपच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करता येऊ शकतात.

इंटरनेट सेवा सुरू असल्यास UPI वर आधारित ट्रान्झॅक्शन करता येईल. जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर USSD वर आधारित बँकिंग सेवेचा ऑप्शन सिलेक्ट करता येईल.

यासाठी *99# डायल करावे लागेल. त्यानंतर मोबाइलवर एक वेलकम स्क्रिन डिस्प्ले होईल. त्यावर Send money, Request money, Check balance, My profile, Pending requests, Transactions आणि UPI PIN हे ऑप्शन्स दिसतील.

त्यानंतर send money वर क्लिक केल्यानंतर मोबाइल नंबर, पेमेंट अॅड्रेस, सेव्ड बेनिफिशियरी किंवा IFSC कोड आणि अकाऊंट नंबरच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येतील.