पुरूष मंगळावरचे आणि स्त्रिया शुक्रावरच्या (मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन फ्रॉम व्हिनस) असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात, पुरूष आणि स्त्रिया यांच्या मेंदुत काही फरक असतो, त्यांच्या मेंदूतील जोडण्या या लिंगानुसार वेगळ्या असतात हे मिथक आहे, त्यात कुठलेही तथ्य नाही असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
अॅशटन येथील बर्मिगहॅम विद्यापीठाच्या हिना रिपन यांच्या मते पुरूष व स्त्रिया यांच्या मेंदूत काही फरक नसतो;  केवळ आपल्या मनात रूजलेला तो एक समज आहे. स्त्रिया नकाशे वाचू शकत नाहीत किंवा पुरूष एकाचवेळी अनेक कामे करू शकत नाहीत हे समज म्हणजे सगळे थोतांड आहे, त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. लैंगिक फरक हे केवळ पर्यावरणीय घटकांमुळे असतात त्यात अंतर्गत रचनांचा कुठलाही संबंध नसतो, असे द टेलिग्राफने म्हटले आहे. अलीकडच्या अभ्यासानुसार स्त्रियांचा मेंदू हा सामाजिक कौशल्ये, स्मृती व अनेक कामे एकाचवेळी करण्यास अनुकूल असतो, तर पुरूषांचे आकलन व समन्वयीत हालचाल जास्त सुलभ असते असे निष्कर्ष काढण्यात आले होते. याच्या मुळाशी दोघांच्या मेंदूत फरक असतो हा जो समज आहे तो मात्र खरा नाही, असलाच तर दोघांच्या मेंदूमध्ये अगदी किरकोळ म्हणजे नगण्य फरक असू शकतील, पण तेही जीवशास्त्रीय कारणांमुळे नाहीत तर पर्यावरणीय कारणांमुळे असतील, असे सांगून रिपन म्हणतात की, तुम्ही मेंदू उचलून हा मुलीचा मेंदू आहे, हा मुलाचा मेंदू आहे असे म्हणू  शकत नाही. सांगाडा बघितला तर तो सारखाच दिसेल. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, लंडनमधील कॅब चालकांमध्ये तेथील रस्त्यांचे ज्ञान झाल्यानंतर मेंदूत बदल झाले असा दावा एका अभ्यासात करण्यात आला होता, पण त्यात तथ्य नाही. आपल्या मते पुरूष व स्त्रिया यांच्या मेंदूतील फरक हे सांस्कृतिक प्रेरणांमधून होत असतात. त्यामुळे स्त्रियांच्या मेंदूची जोडणी अनेक कामे एकाच वेळी करण्यासाठी अनुकूल असेल तर समाजाच्या तिच्याकडून अपेक्षांमुळे ती असू शकेल व त्यामुळे ती तिचा मेंदू नेहमी तसा वापरते म्हणून वेगवेगळी कामे एकाचवेळी करू शकते, ज्याला आपण आधुनिक भाषेत मल्टीटास्किंग म्हणतो. मेंदूतील ज्या स्नायूंचा वापर जास्त होतो त्याची वाढ जास्त होते व तीच वाढ व तिच्या आनुषंगिक मेंदूची रचना स्वीकारली जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!