News Flash

भूमध्यसागरी आहाराचा मेंदूवर सकारात्मक परिणाम

भूमध्यसागरी आहार मेंदूच्या आरोग्यास चांगला असतो

| February 2, 2017 01:36 am

फळे, भाज्या, ऑलिव्ह तेल, कडधान्ये यांचा समावेश असलेला भूमध्यसागरी आहार मेंदूच्या आरोग्यास चांगला असतो, असा दावा नवीन अभ्यासात केला आहे. वृद्ध लोकांसाठी या आहाराचा पाठपुरावा केला असता त्यांच्यात मेंदूची हानी तीन वर्षांच्या काळात कमी दिसून आली तर ज्यांनी हा आहार घेतला नाही त्यांच्यात ती जास्त दिसून आली. आधीच्या अभ्यासापेक्षा वेगळे मत व्यक्त करताना वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, मासे जास्त खाणे व मांस कमी खाणे यांचा संबंध मेंदूशी असत नाही. भूमध्य सागरी आहारात फळे, भाज्या, ऑलिव्ह तेल, गहू, तांदूळ, मासे, दुग्धजन्य पदार्थ व मद्य, लाल मांस व कोंबडीजन्य उत्पादने (अर्थात मर्यादित प्रमाणात) असतात. आपले वय वाढते तसे मेंदूचा आकार कमी होतो. मेंदूच्या पेशी मरतात व त्याचा आकलन व स्मृतीवर परिणाम होतो, असे स्कॉटलंडच्या एडिंग्टन विद्यापीठाच्या मिशेल ल्युसियानो यांनी सांगितले. भूमध्य सागरी आहाराचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो, असा या अभ्यासाचा अर्थ आहे, असे ल्युसियानो यांनी सांगितले. संशोधकांनी स्कॉटलंडमधील ९६७  वयोवृद्ध म्हणजे ७० वर्षांवरील व्यक्तींच्या आहार सवयींचा अभ्यास केला. त्यांना विस्मरणाची व्याधी नव्हती. ५६२ जणांच्या मेंदूचे एमआरआय स्कॅन केले असता भूमध्य सागरी आहार घेणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूतील करडा भाग व कॉर्टेक्सची जाडी वाढलेली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 1:36 am

Web Title: sea food good for health
Next Stories
1 निद्रानाशासाठी योगा आणि अ‍ॅरोबिक्स निरुपयोगी
2 How to make Mix Bhaji | चवदार : मिक्स भाजी
3 नया है यह! लेनोवो के 6 नोट
Just Now!
X