20 March 2019

News Flash

भारतातील पत्ते शोधणे होणार सोपे; गुगल मॅपमध्ये खास बदल

विशेष कोडव्दारे सापडणार नेमका पत्ता

आपल्याला कोणताही पत्ता शोधायचा असेल की हल्ली कोणाला विचारायची वेळ येत नाही. कारण गुगलने ही गोष्ट अतिशय सोपी केली आहे. गुगल मॅप्सवर आपल्याला पोहोचायचे असलेले ठिकाणी टाकले की तो आपल्याला योग्य पद्धतीने त्याठिकाणी नेऊन पोहचवतो. इतकेच नाही तर शॉर्टकट, तसेच कुठे वळावे लागेल, किती वेळाने वळावे लागेल याची इत्यंभूत माहिती देतो. असे असूनही अनेकदा गल्लीबोळातील रस्ते शोधताना आपली तारांबळ उडते. पण याचाच विचार करुन गुगलने भारतीयांसाठी गुगल मॅप या आपल्या सुविधेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

यासाठी प्लस कोडस नावाचे एक नवीन फिचर लाँच करण्यात आले आहे. खास भारतीयांसाठी तयार करण्यात आलेल्या या फिचरमुळे भारतीयांचे रस्ते शोधण्याचे काम आणखी सोपे होणार आहे. यामध्ये प्रत्येक लोकेशनसाठी एक युनिक कोड देण्यात येणार आहे, ज्यामुळे विशिष्ट ठिकाण शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि तुम्ही गुगल मॅपच्या साह्याने रस्ता शोधत असाल तर तुम्हाला मॅप्सवर काही गोष्टींची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेमका पत्ता सहज सापडू शकेल. यासाठी गुगल मॅपवर त्या कोडबरोबरच त्या शहराचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर आपल्याला हवी असलेली जागा मिळेल.

६ आकडी असलेला हा कोड कोणीही कुठेही वापरु शकेल. तसेच हा कोड शेअरही करता येणार आहे. डेस्कटॉप आणि स्मार्टफोन असे दोन्ही वापरणाऱ्यांसाठी हा कोड उपयुक्त ठरु शकतो. याबरोबरच गुगल मॅप्समध्ये असणारी व्हॉईस सर्व्हीस आता ६ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये मिळू शकेल. यामध्ये बंगाली, गुजराती, तेलगु, तमिळ आणि मल्ल्याळम भाषेचा समावेश करण्यात आला आहे.

First Published on March 13, 2018 8:43 pm

Web Title: searching indian address on google maps will be simpler