दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सेट-अप बॉक्ससाठी लवकरच एक नवी यंत्रणा आणणार आहे. मोबाइल सिमकार्ड पोर्टेबिलिटी प्रमाणेच केबल ऑपरेटर आणि डीटीएच कंपन्यांच्या सेट-टॉप बॉक्सचे कार्डही बदलता येणार आहे. ट्रायने रविवारी ही माहिती दिली. ट्रायच्या या नव्या निर्णयामुळे जे ग्राहक आताच्या ऑपरेटर कंपनीला कंटाळले आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे. केबल आणि डीटीएच सेवा घेणारे देशभरात जवळपास १६ कोटी ग्राहक आहेत. २०१९ च्या वर्षाखेरपर्यंत ही सुविधा सुरू होण्याची शक्याता असल्याचे ट्रायने सांगितले आहे.
(आणखी वाचा : ‘ट्राय’चे नवे नियम १ फेब्रुवारीपासून लागू )
ट्रायच्या या निर्णयवर काही डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्या आणि केबल ऑपरेटर्सनी विरोध दर्शवला आहे. प्रत्येक कंपनीचे सेट-टॉप बॉक्स वेगळे आहेत. जर सेट-अपबॉक्सशी छेडछाड झाली तर कंपन्यांची माहिती चोरी होऊ शकते, असा युक्तीवाद करत डीटीएच कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पण ट्रायने यावर उपाय निवडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संबधित तज्ञांशी याविषयावर मंथन सुरू आहे. या वर्षाखेरीस पोर्टेबिलिटी सुरू होऊ शकते, अशी माहिती ट्रायचे प्रमुख आर. एस. शर्मा यांनी दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 28, 2019 5:47 pm