News Flash

एकाहून जास्त जणांशी लैंगिक संबंध ठरु शकतात धोक्याचे

पहिली समस्या म्हणजे गर्भधारणा आणि याहून अधिक धोकादायक असणारी दुसरी समस्या म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे संक्रमण

आजच्या आधुनिक समाजात एकाहून जास्त जणांशी लैंगिक संबंध ठेवणे हे अतिशय सामान्य झाले आहे. विशेषतः उत्तेजक द्रव्य आणि दारूच्या आहारी गेलेल्या माणसांमध्ये हे प्रमाण जास्त असून, अशी माणसे स्वतःला ‘कुल’ सिद्ध करण्यासाठी दर आठवड्याला किंवा महिन्याला वेगवेगळ्या जोडीदारासोबत बेजबाबदार लैंगिक संबध ठेवतात. परंतु, याप्रकारचे लैंगिक संबध ठेवणाऱ्या स्त्रियांना, यामुळे भविष्यात किती मोठा धोका पत्करावा लागू शकतो. अनेक स्त्रिया लैंगिक संबंधावेळी आपल्या साथीदारास कंडोमचा वापर करण्याबाबतची सूचना देण्यास अवघडतात, त्यामुळे असुरक्षित संभोग केला जातो. या बेजाबदार लैंगिक संबंधांचा, स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो, त्यातील पहिली समस्या म्हणजे गर्भधारणा आणि याहून अधिक धोकादायक असणारी दुसरी समस्या म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे संक्रमण ! असुरक्षित संभोगानंतर गर्भधारणा झाली आणि ती नको असेल तर गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र १० ते १५ टक्के महिलांना या गोळ्या घेऊनदेखील गर्भधारणा होते असे काही अभ्यासातून समोर आले आहे.

अनेक महिला नको असताना गर्भधारणा झाल्यास शस्त्रक्रिया करुन गर्भपात करण्याचा पर्यायही स्वीकारतात. मात्र हे अत्यंत याद्वारे गर्भपाताची शक्यता असते. त्यामुळे भविष्यात मृत्यू येण्याचीही शक्यता असते. गर्भाशयातील फेलोपियन नलिकांना नुकसान पोहचवते, ज्यामुळे वंध्यत्व येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे भविष्यात गर्भधारणेची आवश्यकता भासल्यास, त्या महिलेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. लैंगिक भागीदाराकडून लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) होणे हादेखील असुरक्षित संबंधातून निर्माण होणारा एक धोका असतो. याशिवाय योनिमार्गाचा दाह, योनीला होणारी तीव्र खाज, वारंवार लघवी होणे आणि वेदनादायक लघवी यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. अशाप्रकारची लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला आणि संसर्गावर उपचार घेणे गरजेचे आहे.

एसटीआयच्या सुक्ष्मजंतूंना प्रतिजैविकांद्वारे सहज हाताळता येते, पण याद्वारे केवळ व्हायरल इन्फेक्शन दडपले जाऊ शकते. त्यामुळे लैंगिक संक्रमणामुळे होणाऱ्या संसर्गाचा ठोस उपचार घेण्यासाठी दोन्ही लैंगिक संबंधकांनी उपचार घेण्याची गरज असते. मात्र जेव्हा दोघे एकाचवेळी उपचार घेत नाही, तेव्हा जंतूसंसर्ग झालेल्या साथीदारापासून पुन्हा लैंगिक संसर्ग संक्रमण वारंवार होत असते. पुरुष भागीदाराला या जंतुसंसर्गाचा बहुतांश त्रास होत नसल्यामुळे ते उपचार घेण्यास टाळाटाळ करतात, अशामुळे लैंगिक संसर्ग संक्रमणाविरुद्ध केले जाणारे उपचार व्यर्थ ठरण्याची शक्यता असते. या सर्व कारणांमुळे लैंगिकदृष्ट्या क्रियाशील असलेल्या सर्व महिलांसाठी देण्यात येणारा सोप्पा सल्ला म्हणजे, एक किंवा अनेक भागीदारासोबत लैंगिक सबंध ठेवताना गर्भधारणा आणि एसटीआयची समस्या टाळण्यासाठी कंडोमचा वापर आवर्जून करावा. दुसरीकडे, जेव्हा पुरुष असुरक्षित लैंगिक संबंधाला आग्रही असतो, तेव्हा त्यालादेखील महिला भागीदाराकडून संसर्ग वाढण्याचा धोका समान पातळीवर असतो. एचआयव्ही, हिपेटायटीस बी, हिपेटायटीस सी आणि एचपीव्ही यांसारखे कोणतीही लक्षणे न दिसणारे प्राणघातक लैंगिक विषाणू संक्रमित होऊ शकतात. ज्यामुळे दीर्घकालीन अपंगत्व, मृत्यू आणि कर्करोगासारखे आजार जडतात. लैंगिक संसर्ग संक्रमणाचा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक होतो.

डॉ. दूरु शाह

स्त्रीरोगतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 6:56 pm

Web Title: sexually transmitted diseases are dangerous for health to men and women also
Next Stories
1 होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लॉन्च , मारुती डिझायरला देणार टक्कर
2 या फेसपॅकच्या वापरामुळे त्वचा घेईल मोकळा श्वास !
3 WhatsApp मध्ये आले एकाहून एक भन्नाट फिचर्स , ग्रुप चॅटिंग झाली आणखी मजेदार
Just Now!
X