30 September 2020

News Flash

इंडियन ब्रँड Shinco ने लाँच केले तीन शानदार TV, जाणून घ्या किंमत

43 इंचापासून 55 इंचापर्यंतचे तीन शानदार स्मार्ट टीव्ही लाँच

इंडियन स्मार्ट टेलिव्हिजन ब्रँड Shinco ने तीन नवीन टीव्ही लाँच केले आहेत. कंपनीने आपल्या ग्रेटर नोएडाच्या प्रकल्पात हे तिन्ही टीव्ही मॅन्युफॅक्चर केले आहेत. शिंकोच्या या तिन्ही टीव्हीची विक्री ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉन इंडियाच्या प्राईम डे सेलमध्ये सुरू झाली आहे. सेलमध्ये 16 हजार 699 रुपये इतकी टीव्हीच्या बेसिक मॉडेलची किंमत आहे.

(घसघशीत सवलतीसह Smart TV खरेदी करण्याची संधी, ‘वनप्लस’च्या टीव्हीवरही बंपर डिस्काउंट)

किंमत –
Shinco ने 43 इंचाचा SO43AS, 49 इंचाचा 4K SO50QBT आणि 55 इंचाचा 4K SO55QBT असे तीन टीव्ही आणले आहेत. प्राईम डे सेलमध्ये 43 इंचाचा टीव्ही 16 हजार 699 रुपयांमध्ये (एमआरपी 18,199 रुपये) आणि  49 इंचाचा टीव्ही 24 हजार 250 रुपयांमध्ये (एमआरपी 25,999 रुपये)खरेदी करता येईल. तर, 55 इंचाचा 4K SO55QBT मॉडेल 28 हजार 299 रुपयांमध्ये (एमआरपी 29,999 रुपये) उपलब्ध आहे.

फीचर्स –
43 इंचाच्या FHD टेलिव्हिजनला अँड्रॉइड 8.0 चा सपोर्ट आहे. यामध्ये 1GB रॅम आणि 8 स्टोरेज आहे. तर, 49 इंचाच्या 4K SO50QBT टेलिव्हिजनला अँड्रॉइड 9 चा सपोर्ट आहे. या टीव्हीमध्ये 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे. हा टीव्ही dbx-tv साउंड टेक्नॉलॉजीसह येतो. यात ब्लूटूथ, सर्टिफाइड अॅप्स, क्वॉडकोर A55 प्रोसेसर आहे. याशिवाय, 55 इंचाच्या मॉडेलला अँड्रॉइड 9 चा सपोर्ट असून यात 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे. या तिन्ही टीव्हीमध्ये 20w स्पीकर्स मीळतील.  याशिवाय जिओ सिनेमा, डिज्नी+हॉटस्टॅर, Sony Liv, Voot ,Sun NXT, Eros Now,Alt Balaji, झी-5 आणि हंगामा प्ले यांसारख्या अनेक अ‍ॅप्सचा तिन्ही टीव्हीला सपोर्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 1:10 pm

Web Title: shinco launches new 43 inch 49 inch and 55 inch smart tvs price starts at rs 16999 check details sas 89
Next Stories
1 अजून स्वस्त झाला जगातला ‘मोस्ट पॉप्युलर’ स्मार्टफोन, 15 ऑगस्टपर्यंत ऑफर
2 64MP कॅमेऱ्यासह तब्बल 6000mAh ची बॅटरी, सॅमसंगच्या शानदार स्मार्टफोनचा ‘सेल’
3 भारताने ‘बॅन’ केलं Mi Browser अ‍ॅप , ‘शाओमी’च्या युजर्सना बसणार फटका
Just Now!
X