स्त्री आणि पुरुषांच्या पोशाखात कमालीचा फरक असला तरी शर्ट किंवा टी-शर्ट हे या दोहोतला समान दुवा आहे, कारण अठराव्या शतकापर्यंत फक्त पुरुषी असलेल्या शर्टने महिलांच्या पोशाखातही मानाचे स्थान मिळविले. पाश्चिमात्यांच्या प्रभावामुळे पारंपरिक भारतीय पोशाखातील कुडता आणि सदऱ्यानेही कालाय तस्मै नम: म्हणत सुटसुटीत शर्टला शरण जाणे पसंत केले. एके काळी फक्त शर्ट घालणे अशिष्ट समजले जाई, कारण शर्ट हे कोटाच्या आत घातले जाणारे अंतर्वस्त्र होते. पुढे शर्टने त्याच्यावरील कोट किंवा ब्लेझरचे आवरण झुगारून देत मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली तेव्हा शर्टचा खरा पूर्ण चेहरा जगापुढे आला. दरम्यान काळानुरूप अनेक रूपे धारण करून शर्टने फॅशनविश्वातील आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे..

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips
MPSC मंत्र : भूगोल मूलभूत अभ्यास

पोशाख हा व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. आपण जो पोशाख परिधान करतो त्यावरून आपण कसे आहोत, आपले व्यक्तिमत्त्व कसे आहे हे कळते. सौंदर्याच्या संकल्पनाही बऱ्याचशा कपडय़ांशी निगडित असतात. त्यामुळे केशरचना आणि पादत्राणांपेक्षा तुम्ही कोणते कपडे घातले आहेत आणि ते तुम्हाला शोभून दिसताहेत का यावर आपले व्यक्तिमत्त्व अवलंबून असते. आपला अनुभव, ज्ञान, आपला स्वभाव हे सर्व नंतर कळते. ‘फर्स्ट इम्प्रेशन’ हे कपडय़ांद्वारेच होते. त्यामुळेच कपडय़ांची निवड काळजीपूर्वक केली जाते. विशेषत: तरुण वर्ग याबाबतीत अतिशय सजग असतो. ते त्यांच्या ड्रेसिंग स्टाईल म्हणजेच शर्ट्स, टी-शर्ट्स आणि पँट्स यावर जास्त लक्ष देत असतात. शर्ट्स आणि टी-शर्ट्सच्या विश्वात अनेक बदल होत असतात. आपल्याकडच्या कुर्ता किंवा सदऱ्याच्या या पाश्चिमात्य भावंडाचे अनेक अवतार सध्या पाहायला मिळतात. कधी शर्ट्सची एकदम नवीनच स्टाईल बाजारात येते, तर कधी रेट्रो आणि मॉडर्न अशा मिक्स लुकमधल्या स्टाईलही लोकप्रिय होत चालल्या आहेत.

जगातील सर्वात जुना शर्ट हा तीन हजार वर्षांपूर्वी फ्लिंडर्स पेट्री यांनी इजिप्तमध्ये बनविला होता. सुरुवातीच्या काळात शर्ट हे पुरुषांसाठी एक प्रकारचे (अंतर्वस्त्र) अंडरगार्मेट म्हणून वापरले जात होते, कारण शर्टवर कोट किंवा ब्लेझर असे. केवळ शर्ट घातलेली व्यक्ती अपूर्ण पोशाखात असल्याचे समजले जाई. अगदी १८ व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हा समज दृढ होता. कालांतराने हा समज बदलून १८ व्या शतकात शर्ट पूर्ण पोशाखाच्या पात्रतेस उतरला. याच काळात शर्टाने आपले पुरुषप्रधानत्व झुगारून दिले. युरोप आणि अमेरिकेत १८६० नंतर महिलाही मोठय़ा प्रमाणात शर्ट घालू लागल्या.

 कापड दोन प्रकारचे असते

एक- नॅचरल फॅब्रिक आणि मॅन-मेड फॅब्रिक. नॅचरल फॅब्रिक म्हणजे कॉटन, सिल्क आणि मॅन-मेड फॅब्रिक म्हणजे पॉलिस्टर इ. शर्ट्सचे मुख्यत: तीन प्रकार असतात. कॅज्युअल शर्ट्स, ऑफिस शर्ट्स आणि फॉर्मल म्हणजेच पार्टी शर्ट्स.

कुर्ती शर्ट्स

सण-समारंभातघातल्या जाणाऱ्या कुर्तीसारखेच कुर्ती शर्ट्स सध्या सर्व वयोगटांत लोकप्रिय आहेत. त्यांनी लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कॉटन, टेरिकॉटन अशा विविध मटेरिअल्सपासून हे शटर्््स तयार केले जातात. चायनीज आणि मँडारिन कॉलरमध्ये उपलब्ध असलेले हे शर्ट्स आपण जीन्स, ट्राऊझर्स आणि ३/४ सारख्या सगळ्या प्रकारच्या पँट्सवर परिधान करू शकतो.

लिनिन शर्ट्स

सर्व क्षेत्रांतील लोकांमध्ये लेनिन शर्ट्स खूप प्रसिद्ध आहेत. मुंबईच्या वातावरणास अनुसरून बाराही महिने घातले जाणारे हे शर्ट्स अधिक करून पांढरा, निळा, हिरवा अशा अनेक एकरंगीय पद्धतीत उपलब्ध आहेत. इतर शर्ट चुरगळला की त्याची ऐट कमी होते. लिनिन शर्ट्सचे वैशिष्टय़ हे की, ते चुरगळल्यावर अधिक उठावदार आणि आकर्षक दिसतात. जीन्स आणि फॉर्मल्सवर परिधान केले जाणारे हे शर्ट दररोजच्या वापराबरोबरच  सण-समारंभांमध्येही घालता येतात.

ड्रेस शर्ट्स

कार्यालयात किंवा कॉर्पोरेट विश्वात काम करणाऱ्यांमध्ये फुल स्लीव्ह असलेले ऑफिस शर्ट म्हणजेच ड्रेस शर्ट फार लोकप्रिय आहेत. ऑफिसच्या वापराप्रमाणे शर्टला लवकर सुरकुत्या पडू नयेत म्हणून त्यात कॉटनबरोबरच टेरिकॉटनही वापरले जाते. लाइट रंगाबरोबरच प्लेन, चेक्स आणि स्ट्राइप्स पॅटर्नमध्ये असलेले हे ड्रेस शर्ट्स कार्यालयातील वातावरणात उठावदार दिसतात. जीन्स आणि ट्राऊझरवर आपण ड्रेस शर्ट परिधान करू शकतो.

पार्टी शर्ट्स 

वाढदिवस, लग्न, ऑफिस पार्टी अशा विविध विशेष प्रसंगांसाठी आपल्या प्रत्येकाकडे दररोजच्या कपडय़ांबरोबरच वैशिष्टय़पूर्ण असे फॉर्मल म्हणजेच पार्टी ड्रेस असतात. पार्टी ड्रेस हे चमकदार आणि आकर्षक दिसण्यासाठी सिल्क, लेनिन, टेरिकॉटन, कॉटनपासून बनविले जातात. हे शर्ट्स स्मॉल कॉलर, बटन कॉलर, चायनीज कॉलर अशा विविध प्रकारच्या कॉलर्समध्येही उपलब्ध असतात. या शर्टाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यातील खूपसे प्रिंटेड शर्ट्स हे हवाई, फिजी, गोवा अशा काही ठिकाणच्या समुद्रकिनारपट्टीच्या प्रदेशातील प्रिंट्समुळेही प्रसिद्ध झाले आहेत.

गोल्फ शर्ट्स

रोजच्या आणि ऑफिसच्या वापरासाठी असलेले पोलो शर्ट्स म्हणजेच गोल्फ शर्ट्स खूप प्रचलित आहेत. हाफ बाह्य़ांचे असलेले हे शर्ट्स कॉटनचे असतात. विविध रंगांमध्ये उपलब्ध असणाऱ्या या शर्ट्समध्ये चेक्स किंवा स्ट्रिप्ससारखे पॅटर्न्‍स खूप कमी बघायला मिळतात.

कॅम्प शर्ट

कॅज्युअल म्हणजेच कॅम्प शर्ट हा महाविद्यालयीन तरुणाईचा सर्वात आवडता प्रकार. भारतीय हवामानाप्रमाणे अधिकाधिक कॅम्प शर्ट हे कॉटनपासून बनविले जातात. विविध रंगांप्रमाणेच चेक्स आणि प्रिंटेड पॅटर्नमध्ये सर्वात जास्त उपलब्ध असलेले हे शर्ट्स दिसायलाही खूप आकर्षक आणि ट्रेंडी दिसतात. कमी देखभाल (मेंटेनन्स) करावे लागणारे हे कॅज्युअल शर्ट, ३/४, जीन्स , ट्राऊझर अशा प्रकारच्या पॅन्ट्सवर परिधान करता येतात.

नक्षीदार शर्ट्स  

तारे, पक्षी, ठिपके अशा अनेक आकारांचे वैविध्यपूर्ण टेक्श्चर असलेल्या डिझायनर शर्ट्सने सध्या तरुणाईला खूप आकर्षित केले आहे. कॉटन, टेरिकॉटनपासून बनवलेले हे शर्ट्स आपण जीन्स, ट्राऊझर्स आणि ३/४ सारख्या सगळ्या प्रकारच्या पँट्सवर परिधान करू शकतो. या शर्ट्सचे वैशिष्टय़ म्हणजे डिझायनर शर्ट दररोजच्या वापराबरोबरच  सण-समारंभांमध्येही घालता येतात.

कपडय़ांची निगा राखण्यासाठी आणि कपडय़ांची चमक  ठेवण्यासाठी ड्रेस एक्स्पर्ट राजेश धीर यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

  • कपडे कधीही थंड पाण्यानेच धुवावेत.
  • कपडे धुताना नेहमी सॉफ्ट डिटरजंटचा वापर करावा
  • शर्टावर अत्तर किंवा परफ्यूम कमीत कमी फवारावे.