News Flash

पाठदुखीने त्रस्त आहात? मग जाणून घ्या उपाय

जाणून घ्या, पाठदुखीची कारणे आणि उपाय

पाठदुखीने त्रस्त आहात? मग जाणून घ्या उपाय

लॉकडाउनचा काळ सुरु झाल्यापासून अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा पर्याय दिला आहे. त्यामुळे अनेक जण घरी राहूनच ऑफिसचं काम करत आहेत. परंतु, या काळात सतत एकाच ठिकाणी ८-९ तास बसून काम केल्यामुळे अनेकांना शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. यात पाठदुखी आणि कंबरदुखी या समस्येने अनेक जण त्रस्त आहेत. परंतु, पाठदुखीचे अनेक कारणं आहेत. केवळ एकाच ठिकाणी बसून पाठदुखी होत नाही.तर, त्यासाठी अन्यही काही गोष्टी जबाबदार असतात. त्यामुळे चला तर मग पाहुयात पाठदुखीची कारणे आणि त्यावरील उपाय.

पाठदुखीची कारणे –
पाठदुखी ही कोणत्याही वयात होणारी समस्या आहे. अनेकांना पाठदुखीसोबतच छातीत दुखणे, खांदे दुखणे यासारख्या समस्याही भेडसावत असतात.

१. जर मानसिक ताण किंवा तणाव असेल तरी पाठ दुखू शकते.

२. एखाद्या वेळी पाठीला किंवा त्या भागातील इतर अवयवांना दुखापत झाल्यास पाठ दुखू शकते. तसंच फ्रॅक्चर झाल्यास पडल्यासही पाठ दुखू शकते.

३.स्नायू आकुंचन पावतात

४. ताणलेले स्नायू किंवा अस्थिबंध

५. अचानक, विचित्र हालचाली करणे

६. खूप जड वजन उचलणे

७. चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे

पाठदुखीवर उपाय –

१. पाठदुखत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित व्यायाम करावा. तसंच फिजिओथेरेपिस्टशीदेखील चर्चा करावी.

२. आहारात योग्य पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा समावेश केल्यास हाडांना मजबुती मिळते.

३. पोटाभोवती वाढलेले वजन तुमच्या पाठीवर ताण आणू शकते. अधिक काळ एकाच स्थिती मध्ये घालवल्यास मणक्याला अनैसर्गिक वक्रता येऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवावे. तसंच काम करताना दर अर्ध्या तासाने उठून थोडे चालावे.

४. सरळ उभे रहा, डोके पुढच्या बाजूस सरळ असावे, दोन्ही बाजूंनी आपले वजन समतोल राखून ठेवा. तुमचे पाय सरळ ठेवा आणि आपले डोके मणक्याच्या रेषेमध्ये सरळ असावे.

५. वस्तू उचलताना, आपण शक्य तितके सरळ पुढे ठेवा, आपले पाय एका पायसह थोडे पुढे सरकवा जेणेकरुन तुमचे समतोल राहू शकेल. केवळ गुडघावर वाकवा, आपल्या शरीराच्या जवळ वजन धरून ठेवा आणि शक्य तितके कमीतकमी तुमच्या पाठीची स्थिती बदलताना पाय सरळ करा.

६. करताना पाठीला योग्य आधार घ्या. लांब प्रवासादरम्यान भरपूर विश्रांती घ्या.

७. झोपताना चांगल्या प्रतीच्या गादीचा वापर करा. ज्यामुळे तुमच्या मणक्यावर ताण पडणार नाही. उशीचा उपयोग करा, परंतु तुमच्या मानेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

८. फ्लॅट शूज वापरल्याने पाठीवर कमी ताण येतो

दरम्यान, ऑस्टियोपोरोसिस, संधिवा, सिटीका, डिस्क बल्ज, डिस्क्स तुटणे, रीढला वक्राकार येणे, मूत्रपिंड समस्या या कारणामुळेही पाठदुखी होऊ शकते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 4:17 pm

Web Title: signs reasons and preventive measures back pain ssj 93
टॅग : Lifestyle News
Next Stories
1 मंदीत संधी; CRPF मध्ये निघाली भरती, पगार एक लाख ४२ हजार रुपयांपर्यंत
2 Jio ने केली तक्रार, म्हणून ब्लॉक झाले एअरटेल-व्होडाफोनचे प्लॅन
3 अखेर बहुप्रतिक्षित ‘बॉबर स्टाइल बाइक’च्या डिलिव्हरीला होणार सुरूवात, आकर्षक ऑफरचीही कंपनीकडून घोषणा
Just Now!
X