25 October 2020

News Flash

पाठदुखीची लक्षणे, कारणे आणि उपाय

वेदना सहसा उपचारांशिवाय बऱ्या होऊ शकतात

– डॉ. श्रेयस काठारानी

पाठीच्या वेदना खालच्या भागातील नितंब आणि पायांपर्यंत सर्व भागामध्ये असते. वेदना सहसा उपचारांशिवाय बऱ्या होऊ शकतात, परंतु जर खालीलपैकी कोणतेही लक्षणे असतील तर आपण डॉक्टर किंवा फिजियोथेरेपिस्टला दाखवणे गरजेचे आहे.

– ताजी दुखापत, पाठीवर आघात झालेले असणे.
– पाय दुखणे
– सतत पाठीत वेदना, जिथे विश्रांती किंवा झोपून सुद्धा आराम मिळत नाही
– पाठीत दाह किंवा सूज
– विविध भागात वेदना जसे कि पाय / जननेंद्रिया / गुदा / नितंब
-मूत्र किंवा मल वाहून जाण्यास अडचण येणे

पाठ दुखीची कारणे
पाठीत दुखी हि दुखापत, काम करताना किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे होऊ शकते. हे कोणत्याही वयाच्या लोकांना प्रभावित करू शकते. जसजसे वय वाढत जाते तसतसे पूर्वीच्या पेशी आणि डीजेनेरेटिव्ह डिस्क रोगांसारख्या कारणामुळे, वेदना वाढण्याची शक्यता वाढते.
पाठीच्या खालच्या भागाची वेदना डिस्क, रीढ़ आणि तंत्रिका, पाठीच्या खालच्या भागातील स्नायू, ओटीपोट आणि पेल्विक अंतर्गत अवयवांशी संबंधित असू शकते. वरच्या भागातील पाठीची वेदना जसे कि महाधमनीचा विकार, छातीत दुखणे आणि रीढ़ला सूज येणे.

कारण

– मानसिक ताण
– दुखापत, फ्रॅक्चर किंवा पडणे
– डिस्क्स खराब होणे
– स्नायू आकुंचन पावतात
– ताणलेले स्नायू किंवा अस्थिबंध
– अचानक, विचित्र हालचाली करणे
– खूप जड वजन उचलणे
– चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे

संरचनात्मक समस्या
– ऑस्टियोपोरोसिस
-संधिवात
– सिटीका
– डिस्क बल्ज
– डिस्क्स तुटणे
– रीढ़ ला वक्राकार येणे
– मूत्रपिंड समस्या

हालचाल आणि शरीराची विशिष्ठ ठेवण

– पाठ दुखणे काही दररोजच्या क्रियाकल्पांमुळे किंवा खराब स्थितीमुळे होऊ शकते
– दीर्घ कालावधीसाठी एकाच मुद्रेत बसून राहणे
– काहीतरी जोराने आणणे, खेचणे, उचलणे
– मानेला मागे- पुढे ढकलणे, जसे की वाहन चालवणे किंवा संगणक वापरणे
– ब्रेक न घेता लांब पल्ल्याची सतत ड्रायव्हिंग
– गादीवर झोपल्याने शरीराला आधार मिळत नाही आणि पाठीचा कणा सरळ राहतो
– अनावश्यकपणे किंवा दीर्घ काळासाठी झुकून राहणे
– शरीराला अति ताणने
– खोकणे किंवा शिंकणे

प्रतिबंधात्मक उपाय

व्यायाम : व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या फिजियोथेरेपिस्टशी सल्लामसलत करा.

कोअर स्ट्रेंथनिंग – पाठीच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते. फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंगचा मुख्य उद्देश म्हणजे स्पाइन, हिप्स आणि वरच्या पायातील भाग सुधारणे.

आहार : पुरेसे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चा समावेष करणे आवश्यक आहे कारण हे हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहे. योग्य आहार योजना शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत करते.

शरीराचे वजन : विशेषतः आपल्या पोटाभोवती वाढलेले वजन तुमच्या पाठीवर ताण आणू शकते. अधिक काळ एकाच स्थिती मध्ये घालवल्यास मणक्याला अनैसर्गिक वक्रता येऊ शकते. डिस्क्स अतिरिक्त वजनाचा दाब पेलण्याची उणीव भरून काढते, त्यामुळे ते हर्निएटेड बनू शकते, ज्यामुळे सायटॅटिका होऊन संधिवात देखील वाढू शकते.

धूम्रपान : निकोटीन डिस्कला रक्त प्रवाह करणे प्रतिबंधित करते, त्यामुळे कुशेरुक रिढच्या ऱ्हासाची पातळी वाढवते. त्यामुळे पाठीत दुखू शकते. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात धूम्रपान केल्याने खोकल्यामुळे वेदना होऊ शकतात.

उभे राहण्याची स्थिती : सरळ उभे रहा, डोके पुढच्या बाजूस सरळ असावे, दोन्ही बाजूंनी आपले वजन समतोल राखून ठेवा. तुमचे पाय सरळ ठेवा आणि आपले डोके मणक्याच्या रेषेमध्ये सरळ असावे.

उचलताना : वस्तू उचलताना, आपण शक्य तितके सरळ पुढे ठेवा, आपले पाय एका पायसह थोडे पुढे सरकवा जेणेकरुन तुमचे समतोल राहू शकेल. केवळ गुडघावर वाकवा, आपल्या शरीराच्या जवळ वजन धरून ठेवा आणि शक्य तितके कमीतकमी तुमच्या पाठीची स्थिती बदलताना पाय सरळ करा.

ड्रायव्हिंग : करताना पाठीला योग्य आधार घ्या. लांब प्रवासादरम्यान भरपूर विश्रांती घ्या.

बेड : असे मॅट्रेस असावे जे तुमच्या मणक्याला सरळ ठेवेल आणि तुमच्या खांद्याला आणि पार्श्वभागाचे वजन सांभाळायला हवे. उशीचा उपयोग करा, परंतु तुमच्या मानेला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.

शूज : फ्लॅट शूज वापरल्याने पाठीवर कमी ताण येतो

(लेखक जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये फिजियोथेरपी विभागाचे प्रमुख आहेत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2019 8:29 am

Web Title: signs reasons and preventive measures to treat back ache nck 90
Next Stories
1 मारुती, टाटानंतर आता Renault ने केली ‘ही’ मोठी घोषणा
2 वाह धारावी! ‘ताज’लाही टाकलं मागे; पर्यटकांची पहिली पसंती
3 Harley-Davidson ची सर्वात स्वस्त बाइक, ‘बुलेट’ला देणार टक्कर
Just Now!
X