News Flash

Happy Propose Day 2019 : आज सांगाच…दिल की बात, खास टिप्स

प्रपोज करण्यासाठी सोप्या ट्रीक्स

व्हॅलेंटाइन वीकचा दुसरा दिवस आहे प्रपोज करण्याचा. प्रिय व्यक्तीला गुलाबाचं फूल देत प्रेमाची ‘पहिली हिंट’ दिल्यानंतर आजचा दिवस आहे त्याला आणखी एक सरप्राईज द्यायचा. आपल्या प्रेमभावना व्यक्त करण्याचा हा दिवस. कधीकधी या प्रयत्नात अपयशाला सामोरं जावं लागतं तर कधी पहिल्याच प्रयत्नात होकार मिळतो. त्यामुळे प्रयत्न चुकला तरी आपल्या भावना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं असतं. पण मग प्रपोज करताना नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. अशी कोणती कल्पना आहे जी त्या प्रिय व्यक्तीला प्रभावित करू शकते याचा विचार मनात सुरूच असतो. तर मग आम्ही तुम्हाला देतोय प्रपोज करण्यासाठीच्या १० सजेशन्स

१. तुमच्या पहिल्या भेटीचं ठिकाण-

आपल्या आवडत्या व्यक्तीशी पहिल्यांदा भेट झाल्याचं ठिकाण आपल्या नेहमीच लक्षात राहतं. त्या ठिकाणी परत जाऊन त्या व्यक्तीला आपल्या भावना सांगितल्या तर यश मिळण्याचे चान्सेस जास्त

२. मूव्ही थिएटर-

आपल्या आवडत्या व्यक्तीला एखाद्या छान लाईटहार्टेड सिनेमाला घेऊन जा. दोघांचाही मूड छान प्रसन्न असताना, सिनेमा पाहताना इंटरव्हल झाला की करा व्यक्त आपल्या भावना बिनधास्त.

३. पार्टी-

यासाठी थोडी दोस्तांची मदत लागेल. कोणाच्या घरी एखादी धमाल पार्टी आयोजित करायची. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला अनपेक्षितपणे मनातलं सांगून टाकायचं.

४. समुद्रकिनारा

हे तर सगळ्यात क्लासिक ठिकाण आहे. समुद्राची गाज ऐकत आपल्या प्रियकर/ प्रेयसीच्या साथीने बसून राहण्यातली मजा काही वेगळी सांगायला नको.

५. बोट-

हा एक सध्याचा नव्याने फेमस होणारा प्रकार आहे. बोटिंग करताना किंवा खर्च करायची तयारी असेल तर समुद्रातल्या यॉटवर करा प्रपोझ. समुद्राच्या साक्षीने मस्त माहौल असताना समोरच्या व्यक्तीने हो म्हटलंच पाहिजे.

६.रेस्तराँ-

एखाद्या हॉटेलमध्ये रोमँटिक माहौल बनवून मनातल्या भावना व्यक्त करणं हा ऑप्शन तर आहेच. आपल्या खिशाला परवडेल असे अनेक पर्याय त्यातून निवडता येतात.

७. अॅडव्हेंचर स्पोर्टस्-

हासुध्दा एक नवा ऑप्शन आहे. जरासा ऑफ बीट असणारा हा मार्गही ट्राय करायला हरकत नाही.

८. पेट प्रपोझल

आपण हिंदी सिनेमांमध्ये हा प्रकार बऱ्याचदा पाहिला असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला जर प्राण्यांची आवड असेल तर एखाद्या क्यूट मांजरीच्या किंवा कुत्र्याच्या पिल्लाच्या गळ्यात मेसेज अडकवूनसुध्दा आपण आपलं म्हणणं त्याला/तिला सांगू शकतो.

९. रेडिओ

व्हॅलेंटाईन डेच्या काळात अनेक एफएम चॅनल्सवर आरजेसुध्दा प्रेमवीरांची आणि वीरांगनांची मदत करत असतात. एखाद्या गाण्याची फर्माईश करत ते गाणं आपल्या प्रिय व्यक्तीला डेडिकेट करण्याचाही ऑप्शन तुमच्या कडे आहे. सोबत काही विशेष मेसेज द्यायचा असेल तर तोही आपण सांगू शकतो. आरजे त्यांच्या छान स्टाईलमध्ये तुमचा हा मेसेज समोरच्या व्यक्तीला सांगतील

१०. टीव्ही

टीव्हीवरच्या कार्यक्रमांमधूनही आपल्या ‘सिग्निफिकंट अदर’कडे प्यार का इजहार करण्याची सोय असते. तसंच म्युझिक चॅनल्सवरसुध्दा एखादं गाणं डेडिकेट करत आपण आपला संदेश पोहचवू शकतो.

तर मग दोस्तांनो, रोझ डे काल सेलिब्रेट केला असेल तर तुमच्या प्रेमाची पुन्हा ग्वाही द्यायचा हा एक दिवस आहे. जर काही कारणाने रोझ डे साजरा केला नसेल तर करा तुमच्या ‘प्रेमसफरीची’ आजपासून दणक्यात सुरूवात!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2019 9:45 am

Web Title: simple and easy tips to propose our dream partner
Next Stories
1 क्षयाच्या मुकाबल्यासाठी जीवनसत्त्व ‘ड’ उपयोगी
2 #RoadSafetyWeek : ९० टक्के लोक सीट बेल्टचा वापर न करता जीव घालतात धोक्यात
3 Rose Day Special: जाणून घ्या गुलाबांच्या रंगांचा अर्थ
Just Now!
X