17 October 2019

News Flash

घामोळ्यांनी त्रस्त आहात ? मग करा हे घरगुती उपाय

शरीरावर घामोळ्याची लहानलहान पुरळं आली की प्रचंड त्रास जाणवायला लागतो

उन्हाळा म्हणजे खरं तर खूप धम्माल-मस्ती. एक तर सर्वत्र सुट्टय़ांचं वातावरण असतं. याच दिवसांमध्ये सुट्ट्यांचे प्लॅन केले जातात. त्यातच शाळा-कॉलेजला सुट्टी असल्यामुळे सतत बाहेर फिरायला जाणं, खेळणं हे सारं ओघाओघाने येतंच. मात्र या साऱ्या मौजमस्तीमध्ये एक समस्या असते ती म्हणजे उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेसंबंधीत तक्रारींची. यामध्ये उन्हामुळे त्वचा काळी पडणे, उकाडय़ाने त्वचेवर फोड किंवा पुरळ उठणे, गोवर व कांजिण्यांचे फोड या नेहमीच्या तक्रारी. यासाऱ्यामध्ये सर्वात जास्त तापदायक ठरतं ते म्हणजे घामोळे. शरीरावर घामोळ्याची लहानलहान पुरळं आली की प्रचंड त्रास जाणवायला लागतो. अनेक उपाय किंवा या घामोळ्यांवर सतत पाण्याचा मारा केला तरी शरीराला थंडावा मिळत नाही. मात्र यासाऱ्यावर काही प्राथमिक घरगुती उपचार करता येतील ते पुढीलप्रमाणे –

१. कच्चा बटाटा –
बटाटा ही भाजी लहानांपासून थोरापर्यंत साऱ्यांच्याच आवडीची असते. कोणत्याही भाजीत बटाटा घातला की तो त्या भाजी समरसून जातो. त्यामुळे बटाटा साऱ्यांच्याच आवडीचा. मात्र या बटाट्याचा उपयोग केवळ भाजीपुरता मर्यादित नसून घामोळ्या घालविण्यासाठीदेखील होतो. कच्चा बटाटा घामोळे दूर करण्यासाठी लाभदायक आहे. कच्चा बटाटा गुलाब पाण्यात मिक्स करुन त्याचा लेप करावा. हा लेप २० मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावून ठेवावा. २० मिनिटांनंतर हा लेप काढून गार पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास घामोळ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी होते.

२. चंदन पावडर –
चंदन पावडरचा उपयोग कायम सौंदर्य प्रसाधनांमध्ये केला जातो. चंदन पावडरमुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यासोबतच चेहऱ्यावरील डाग-मुरुम कमी करण्यासही या पावडरचा वापर करण्यात येतो. विशेष म्हणजे या पावडरचा वापर घामोळ्यांपासून सुटका मिळविण्यासाठीदेखील करण्यात येतो. एका वाटीमध्ये एक चमचा चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करुन लेप तयार करावा. हा लेप २० ते २५ मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावावा. लेप वाळल्यानंतर तो काढून थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून तीन वेळा हा प्रयोग केल्यास शरीराला थंडावा मिळून घामोळ्यांचं प्रमाण कमी होतं.

३. बेकिंग सोडा –
बेकिंग सोडा साध्या पाण्यामध्ये मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट १५ मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावाली. त्यानंतर १५ मिनिटांनंतर हा लेप काढून टाकतं थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून ४ वेळा हा प्रयोग करावा.

४. कडीलिंबाची पानं-
गुढीपाडव्याला ज्याचं विशेष महत्व असतं असा कडीलिंबाचा पाला घामोळ्यांच्या त्रासापासून मुक्त करण्यासाठीही तितकाच मदत करणारा ठरतो. कडीलिंबाच्या पानांची पेस्ट करुन ही पेस्ट २० मिनिटे घामोळे झालेल्या भागावर लावाली. त्यानंतर २० मिनिटांनंतर हा लेप काढून टाकतं थंड पाण्याने घामोळे झालेला भाग स्वच्छ करावा. आठवड्यातून ५ वेळा हा प्रयोग करावा.

५. बीट-
बीट पाण्यात उकळावे. हे पाणी गाळून गार झाल्यावर बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. गोवर व कांजिण्यांच्या पुरळ वा फोडांवर हे पाणी मलमाप्रमाणे ब्रशने १-१ तासाने लावावे. पुरळाच्या जागी होणारी आग व खाज कमी होण्यास यामुळे मदत होईल.

First Published on April 23, 2019 2:12 pm

Web Title: simple best home remedies for prickly heat treatment