25 February 2020

News Flash

रजोनिवृत्तीनंतर वजन वाढतंय? मग करा ‘हे’ उपाय

रजोनिवृत्तीनंतर शरीरातील हॉर्मोन्समध्ये बदल होत असतो

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये रजोनिवृत्ती हा नैसर्गिक टप्पा वयाच्या पन्नाशीच्या आसपास येतो. रजोनिवृत्तीला ‘मेनोपॉझ’ असंदेखील म्हणतात. मेनोपॉझ आल्यानंतर अनेक स्त्रियांना यासोबतच काही तक्रारीही सुरु होतात. या दरम्यान शरीरातील हॉर्मोन्समध्ये बदल होत असतो. त्यामुळे या तक्रारी निर्माण होतात आणि त्यांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत जातं. काही महिलांमध्ये वाढत्या वजनाची समस्या निर्माण होते. अनेक वेळा औषधोपचार करुनही या समस्यांपासून सुटका होत नाही. त्यामुळे रुपम सिन्हा यांनी मेनोपॉझनंतर वाढलेलं वजन कसं कमी करावं याविषयीचे काही उपाय सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या उपायांविषयी –

१. हार्मोन बॅलेंन्सिंग थेरपी –
यामध्ये हार्मोन बॅलेंन्सिंग थेरपी आणि हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी अशा दोन प्रक्रिया केल्या जातात. ही थेरपी केल्यानंतर वाढत्या वजनाला आळा बसतो. त्यासोबत शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे ही थेरपी फायदेशीर ठरते. मात्र ही थेरपी डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.

२. एक्सरसाइज –
मेनोपॉझ आल्यानंतर स्त्रियांनी न चुकता व्यायाम केला पाहिजे. व्यायामामुळे शरीर फिट होण्यासोबतच तंदरुस्त होतं. त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक तक्राही कमी होतात. त्यासोबत व्यायाम केल्यामुळे वजन कमी होते.

३. सकस आहार-
सकस आहारामुळे आपण अनेक समस्यांना आपल्यापासून लांब ठेवू शकतो. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये सकस आहाराचा समावेश करावा. दूध, पालेभाज्या, अंडी यांचा समावेश आहारात करावा. विशेष म्हणजे मेनोपॉझनंतर महिलांनी आवर्जुन सकस आहारा घेतला पाहिजे.यामध्ये फायबरयुक्त पदार्थांचा जेवणात जास्तीत जास्त समावेश करावा. त्यासोबतच तळलेले पदार्थांपासून लांब रहावे.

४. पुरेशी झोप-
आरोग्य चांगलं राहण्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. शरीराला ८ तास झोपेची गरज असते. झोप पूर्ण झाल्यानंतर काम करण्याचा उत्साह वाढतो. त्याप्रमाणेच शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. त्यामुळेच मेनोपॉझनंतर निदान शरीराला ६ ते ७ तास झोप घेणे गरजेचे आहे. व्यायाम आणि पुरेशी यामुळे वाढत्या वजनाला आळा बसतो.

 

First Published on May 22, 2019 5:40 pm

Web Title: simple cures for post menopausal weight gain
Next Stories
1 Mercedes-Benz ची BS-VI ई-क्लास सेदान कार लाँच
2 जेवणाची चव वाढविणाऱ्या चक्रीफुलाचे असेही गुणकारी फायदे
3 Hyundai Venue : बहुचर्चित SUV अखेर लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत
Just Now!
X