आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, ‘होम डेकोरेशन टिप्स या फक्त मोठ्याच घरांसाठी उपयुक्त ठरतात, लहान घरांमध्ये होम डेकोरेशन करणं शक्यचं होऊ शकतं नाही इत्यादी.’ पण आता आपल्याला या गैरसमजातून बाहेर पडायलाच हवं. आपलं घरं लहान असो किंवा मोठं तो आपल्या आयुष्यातील सर्वात अविभाज्य आणि जवळचा घटक आहे. आपलं घरं सुंदर, आकर्षक दिसावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं आणि त्यासाठी कधीही जागेचा आकार हा अडथळा ठरत नाही. सजावटीच्या विविध नाविन्यपूर्ण कल्पना, वस्तूंची उत्तम निवड, आकर्षक रंग, प्रकाशयोजना आणि प्रत्येक गोष्टीचा सुयोग्य वापर केला म्हणजे तुमच्या घराचं रूप पालटलंच म्हणून समजा. आर्किटेक्चर आणि डिझाईन कंपनी बिल्डवॉर्क्सच्या क्रिएटिव्ह हेड देविका वर्मा देखील म्हणतात की, “जेव्हा तुम्हाला सौंदर्यशास्त्र समजत असतं तेव्हा लहान जागा ही कधीही समस्या ठरत नाही.”त्यामुळे, तुम्हीसुद्धा जर तुमच्या घरासाठी सजावटीच्या काही सुंदर कल्पनांच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला ह्यात मदत करणार आहोत.

मोठे आरसे

होम डेकोरेशन करताना आरशांचा वापर सर्रास आणि अत्यंत सुंदर पद्धतीने केला जातो. होम डेकोरेशनच्या पुस्तकांमधील ही सर्वात सोपी आणि सर्वात व्यावहारिक टीप आहे. त्याची खास कारणं आहेत. मोठे आरसे हे एखाद्या जागेला आणखी मोठं बनवू शकतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरसे प्रकाश परावर्तित करतात. त्यामुळे, आपलं घरं उजळतं, प्रकाशमान होतं. तुम्ही दरवाजे, वॉर्डरोब शटर किंवा भिंतींवर विविध आकाराच्या, पद्धतींच्या आरशांचा वापर करू शकता. मुख्य म्हणजे बाजारात असंख्य फॅन्सी फ्रेम्सचे आरसे उपलब्ध आहेत.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
Skin care tips jaggery face pack helpful to glowing your skin
चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या? गुळाचा करा खास वापर; त्वचा दिसेल तरुण- चमकदार
Breakfast Recipe
Breakfast Recipe : नाश्त्यात झटपट बनवा मऊसूत जाळीदार आंबोळी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

योग्य प्रकाशयोजना

आपलं घरं उजळवण्यासाठी स्मार्ट लाईट्स हा एक उत्तम पर्याय आहे. आकर्षक प्रकाश योजना नेहमीच लक्षवेधी ठरते. विविध प्रकारच्या लायटिंगमधून तुम्ही घरात तुम्हाला हवा तो मूड क्रिएट करू शकता. अनेक पारंपारिक प्रकाशयोजनांचे पर्याय देखील आपलं घरं उजळवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतात. कपाटांमधील लायटिंग ही देखील एक चांगली कल्पना ठरू शकते.

सरकणारे दरवाजे किंवा शटर आवश्यक

आपल्या वॉर्डरोबसाठी सरकणारे दरवाजे किंवा शटर वापरा. त्याचसोबत साधी आणि सोपी फोल्ड करण्यायोग्य फर्निचर देखील एक चांगला पर्याय ठरतो आहे. त्याचप्रमाणे, बहुतांश वेळा कमीत कमी फर्निचर (मोठं फर्निचर) ही देखील एक चांगली कल्पना आहे. कारण, यामुळे तुमचा जागेचा वापर कमी होतो आणि घरातील इतर वस्तूंची हलवाहलव करणं सोयीचं आणि सोपं ठरतं.

रंगांचा सुयोग्य वापर

छोट्या जागांसाठी गडद रंगांचा वापर केला की ती जागा आणखी लहान आणि अंधुक दिसते. त्यामुळे, गडद रंगांऐवजी हलक्या आणि न्यूट्रल रंगांचा वापर करणं नेहमीच चांगलं ठरेल. हलके रंग लहान जागा उजळण्यासाठी देखील मदत करतात. त्याचसोबत, आपली जागा आहे त्यापेक्षा मोठे दिसण्यास देखील मदत होऊ शकते. पॅटर्न, कलर ब्लॉकींग आणि कलर कॉम्बिनेशन हे पर्याय यासाठी आणखी मदत करू शकतात. योग्य रंगांमुळे तुमची जागा आणखी हवेशीर आणि उजळ दिसते.

पेंटिंग्ज आणि वॉल हँगिंग्ज

कोणतंही पेंटिंग किंवा आपले फोटोज हे नेहमीच आपल्या खोलीला आकर्षक बनवतात. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या फ्रेम्स आणि वॉल हँगिंग्ज वापरू शकता.