मोबाइल हा सध्या आपल्या सगळ्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग झाला आहे. झोपेतून उठल्यापासून ते झोपेपर्यंत बहुतांश कामांसाठी आपल्याला मोबाइल लागतो. अनेकदा काही महत्त्वाचे काम असले की हा फोन अचानक खूप स्लो काम करतो, मधेच हँग होतो. चांगल्या कंपनीचा असला तरी हँग होणं ही बाब फारच कॉमन आहे. पण हे नेमकं होतं तरी कशामुळे आणि ते होऊ द्यायचा नसेल तर काय उपाय करावेत हे जाणून घेऊयात..

स्मार्टफोन्स हँग होण्यामागे काही कारणं-

-एकाच वेळी एकापेक्षा अनेक अ‍ॅप्स चालू असतील तर फोन हँग होऊ शकतो.
-एक्स्टर्नल मेमरीऐवजी फोन मेमरीमध्ये अ‍ॅप्स इन्स्टॉल होत असतील तर.
-इन्टर्नल मेमरी तसेच रॅम जर का नेहमी भरलेली असेल तर.
-मेमरी कार्ड किंवा एक्स्टर्नल मेमरी फुल असेल तर.
-फोन जेव्हा स्टँडबाय मोडवर असतो तेव्हा वापरल्या जाणाऱ्या थीम्सची साइज जर का जास्त असेल तर.
-कुकीज, कॅशे मेमरी, लॉग फाइल्स वेळोवेळी डिलिट केल्या नसतील तर.
-फोनमध्ये खूप सारी अ‍ॅप्स असतील तर.
-फोनच्या रॅम, प्रोसेसरच्या क्षमतेपेक्षा मोठय़ा फाइल्स चालवणं.

मोबाइल हँग होऊ नये यासाठी खालील उपाय करून पाहा- 

व्हॉटसअॅप आणि इतर मेमरी डिलीट करत राहा

आपण व्हॉटसअॅप सध्या मोठ्या प्रमाणावर वापरतो. कधी ऑफीसच्या कामासाठी तर कधी वैयक्तिक वापरासाठी वापरले जाणारे हे अॅप्लिकेशन जास्त मेसेजेसमुळे मर्यादेपेक्षा जास्त मेमरी वापरते. यामध्ये येणारे फोटो, व्हिडियो आणि इतरही अनेक फाईल्स यामुळे फोन स्लो होऊ शकतो. त्यामुळे व्हॉटसअॅप किंवा इतरही सोशल नेटवर्किंगसाठी वापरली जाणारी अॅप्लिकेशन्स वेळच्य़ा वेळी क्लिन करा. त्यामुळे फोनमधील इतर गोष्टी वेगाने चालण्यास सुरुवात होईल.

जाहिरातींपासून सुटका करुन घ्या

जाहिरातींनी हा आपल्या आयुष्यातील मोठा भाग व्यापला आहे. विविध माध्यमांतून वेगवेगळ्या उत्पादनांच्या जाहिराती अगदी सामान्य झाल्या आहेत. आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलमध्येही हल्ली सतत विविध जाहिराती येत असतात. स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या या जाहिराती आपल्याला अनेकदा नकोशा होतात. प्रमाणापेक्षा जास्त जाहिराती येत असतील तर तुमचा फोन हँग होण्याची शक्यता असते. तसेच एखादे काम करताना मधेच जाहिरात आली तरीही नको होते. अशावेळी फोनमध्ये एक विशेष सेटींगची सविधा असते जी केल्यामुळे जाहिरातींपासून सुरक्षित राहता येईल. Settings > Google > Ads > Opt out of Ads Personalization ला ऑन करा. यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिनवर येणाऱ्या अॅड्स दिसणार नाहीत.

कॅश मेमरी(Cache Memory) क्लिअर करा

कॅश मेमरीत भरपूर सारा डेटा नकळत स्टोरेजमध्ये सेव्ह होते आणि मेमरी भरून जाते. त्यामुळे कॅश मेमरी डिलीट केल्यावर तुम्हाला बरीच स्पेस उपलब्ध होऊ शकते. ते करण्यासाठी खालील स्टेपचे अनुकरण करा.
कॅश मेमरी डिलीट करण्यासाठी- Settings –> Storage & USB–> Internal Storage–>Cached Data

फोटोंचा आकार कमी करा

प्रत्येक फोटो आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करणे गरजेचे नसते. काही फोटो आपण गुगल फोटोज किंवा क्लाउड स्टोरेज अॅप्स मध्ये सुद्धा सेव्ह करता येऊ शकतात. गुगल फोटोज किंवा क्लाउड स्टोरेजमध्ये फोटो सेव्ह केल्यावर तुम्ही मोबाईलमधून हे फोटो डिलीट करू शकता.