वैज्ञानिकांनी आता मेंदूचे कार्य चालू बंद करण्याचे म्हणजेच चेतासंस्था चालू-बंद करण्याची कळ (बटन) शोधून काढली आहे.
इ.स. २००५ मध्ये स्टॅनफोर्डचे संशोधक कार्ल डिसेरॉथ यांनी  काही मेंदूपेशी स्वतंत्र पातळीवर चालू बंद करण्याचा प्रयोग प्रकाशीय तंत्राच्या मदतीने विकसित केला होता व त्याला ऑटोजेनेटिक्स म्हणजे प्रकाशीय जनुकशास्त्र असे नाव दिले होते. त्यानंतर जगातील वैज्ञानिकांनी हे तंत्रहृदय, मेंदू व स्कंद पेशी तसेच इतर घटक विद्युतीय संदेशांनी नियंत्रित करण्यासाठी वापरले. तथापि प्रकाश संवेदनी प्रथिने हे पेशींना चालू करण्यात काहीअडचणी येतात हे त्यांनी दाखवून दिले. आता या विषयावर दशकभर बरेच संशोधन झाले असून वैज्ञानिकांनी न्यूरॉन चालू व बंद करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
डेसेरोथ व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही प्रकाश संवेदनी प्रथिनांची फेररचना करून त्यांचा वापर पेशी चालू बंद करण्यासाठी केला असे सायन्स या नियतकालिकाने म्हटले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट अफ मेन्टल हेल्थचे संचालक थॉमस इन्सेल यांनी सांगितले की, कळ बंद करण्यात येत असलेल्या अडचणी मेंदूतील मंडलांची जोडणीचा वर्तन, भावना व विचारांशी असलेला संबंध पाहून दूर करण्यात आल्या. ऑपसिनमुळे धनभारित आयन न्यूरॉनच्या माíगकेतून वाहू शकतात. नवीन पद्धतीने तयार केलेल्या या माíगका ज्या उजव्या बाजूला खाली आहेत त्याच ऋणभाराचे रूपांतर धनभारात होऊ शकते. थोडक्यात यात ऋणभारित आयन वाहून नेणे क्लोराईड आयनांच्या वहनामुळे शक्य झाले. त्यामुळे कळ बंद करता येणे शक्य झाले म्हणजे मेंदूच्या न्यूरॉन्सचे काम थांबवता येते. आम्हाला या संशोधनाविषयी उत्सुकता वाटते आहे, कारण आम्ही उंदीर व माकडे यांच्यावर प्रकाशसंवेदनशीलता कशी काम करते यावर प्रकाश टाकला आहे.