आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येतो. आपण कोणते ही प्रोडक्टस वापरले तरी सुद्धा आपण जे खातो ते आपल्या शरीरासाठी आणि चेहऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्वचारोग तज्ञ डॉ. गीतिका मित्तल यांनी आपल्या त्वचेसाठी कोणते पदार्थ खाणं टाळलं पाहिजे ते सांगितले आहे. चला जाणून घेऊया कोणते पदार्थ आपण टाळले पाहिजे…

“त्वचेत जळजळ होण्यामुळे मुरुम येतात. याचमुळे कारण हे मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले अन्न पदार्थ आहेत. जर तुम्हाला मुरूमांपासून दुर रहायचं असेल तर साखर, मीठ असलेले पदार्थ आणि मद्यपाण करणे टाळा,” असे त्या म्हणाल्या आहेत.

१. दुग्धजन्य पदार्थ

आपल्या रक्तात “आयजीएफ -१” नावाचा हार्मोन असतो जो दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळतो. या हार्मोनमुळे चेहऱ्यावर मुरूम येतात. यामुळे सिबमचे प्रमाण वाढते आणि आपल्या चेहऱ्यावर मुरूम येतात.

२. चॉकलेट
कधी तरी चॉकलेट खाल्यास त्यामुळे मुरूम येत नाहीत. मात्र, ऑस्ट्रेलियन संशोधनानुसार, चॉकलेटमुळे शरीरातील इंसुलिनचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम येतात.

३. एडमामे किंवा हिरव्या रंगाचा सोयाबीन

हिरव्या रंगाचा सोयाबीन सगळ्यासाठी अनुकूल असते असे नाही. कारण त्यात मोठ्याप्रमाणात इस्ट्रोजेन असते ज्यामुळे मुरूम येतात. यामुळे फक्त मुरूम येत नाहीत तर हे शरीरातील व्हिटॅमिन कमी होतात.

४. तेलकट अन्न
बर्गर, पिझ्झा, सोडा इत्यादी चरबीयुक्त किंवा मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर केलेले पदार्थांमुळे मुरूम येतात. या पदार्थांमुळे शरीरात हार्मोन्सचे प्रमाण वाढते.

५. गोड पदार्थ
साखर युक्त पदार्थ, मेपल सिरप हे खाल्याने आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम येतात.

६. ग्लूटेन युक्त पदार्थ
गहू, राई आणि इतर धान्य मध्ये ग्लूटेन आढळते. ग्लूटेन हा प्रोटीनचा एक भाग आहे. ग्लूटेनमुळे मुरुम येतात असे कोणतेही रचनात्मक पुरावे किंवा संशोधन नसले तरी, जर कोणाला गव्हाची अॅलर्जी असेल म्हणजे गहू खाल्याने पोटातील आतल्या बाजूस जळजळ होते. त्यावेळी गहू खाणे टाळले पाहिजे.