05 March 2021

News Flash

त्वचेमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत

त्वचेतील लहान रक्तवाहिन्यांमधून वाहणारा रक्ताचा प्रवाह कमी झाल्यामुळे वरील स्थिती निर्माण होते.

| October 28, 2017 04:22 am

त्वचा ही रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रतिनिधिक छायाचित्र

त्वचा ही रक्तदाब नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. उंदीरावर करण्यात आलेल्या प्रयोगात त्वचेमुळे रक्तदाब आणि हृदयाची गती नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे.

लहान रक्तवाहिन्यांद्वारे रक्तप्रवाह होत असताना त्वचा नेमके काय कार्य करते याबाबतचे संशोधन ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठ आणि स्वीडनमधील करोलिन्का इन्स्टिटय़ूटच्या संशोधकांनी केले. कमी ऑक्सिजनची स्थिती असताना उंदीरांवर हे प्रयोग करण्यात आले.

‘इलाइफ’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये पर्यावरणामध्ये बदलत्या स्थितीतील ऑक्सिजनमध्ये त्वचा रक्तदाब आणि हृदयाची गती कशा प्रकारे नियंत्रित करते हे स्पष्ट करण्यात आले आहे. उच्च रक्तदाब हा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार म्हणजेच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांच्याशी संबंधित आहे.

उच्च रक्तदाबाच्या अनेक प्रकरणांमध्ये कोणतेही माहीत असलेले कारण असत नाही. त्वचेतील लहान रक्तवाहिन्यांमधून वाहणारा रक्ताचा प्रवाह कमी झाल्यामुळे वरील स्थिती निर्माण होते. या लक्षणामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते.

ज्या वेळी उतीला ऑक्सिजन रक्तप्रवाह घेण्याची घाई असते त्या वेळी उती मोठी होते, असे मागील अभ्यासामध्ये दिसून आले होते. अशा परिस्थितीमध्ये वाढलेला रक्तप्रवाह नियंत्रित करण्याचे काम प्रथिनांच्या ‘एचआयएफ’ गटाकडून केले जाते.

असाच प्रयोग उंदरांवर करण्यात आला. यामध्ये सामान्य उंदरांच्या तुलनेत जनुकीय सुधारित असलेल्या उंदीरांमध्ये या प्रथिनांची उणीव होती. त्यामुळे कमी प्रमाणात ऑक्सिजनची पातळी बदलते. याचा परिणाम म्हणून त्याच्या हृदयाची गती, रक्तदाब, त्वचेचे तापमान आणि इतर सामान्य बाबी नियंत्रित राहण्यास मदत झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 4:22 am

Web Title: skin help keep blood pressure under control
टॅग : Blood Pressure
Next Stories
1 खूशखबर! बहुप्रतिक्षित ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर व्हॉट्सअॅपवर उपलब्ध
2 ‘हे’ आहेत गूळ खाण्याचे १० फायदे
3 सतत एसीमध्ये बसण्याने होतात ‘हे’ त्रास
Just Now!
X