‘स्कोडा’ने भारतात 2019 Superb Corporate Edition लाँच केली आहे. या नव्या कारची एक्स शोरुम किंमत 23.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. स्कोडाची ही नवी फ्लॅशगिप सिडॅन केवळ ‘कँडी व्हाइट’ आणि ‘मॅग्नेटिक ब्राउन’ या रंगांमध्ये उपलब्ध असेल.

या कारच्या कॅबिनमध्ये 8-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे. यात मिरर लिंक, अॅपल कार प्ले आणि अँन्ड्रॉइड ऑटो सपोर्टची सेवा आहे. या व्हेरिअंटमध्ये एक अॅप देखील देण्यात आलं असून याद्वारे रेडिओ, म्यूझीक आणि नेव्हिगेशन कंट्रोल करता येतं. याशिवाय यामध्ये कूल्ड ग्लव्ह-बॉक्स आणि 3-झोन क्लायमेट कंट्रोल फीचर देखील आहे. तसंच कारमध्ये ह्युमिडिटी सेंसर देखील देण्यात आलं असून याद्वारे विंडस्क्रिनवरील फॉग कमी होतो. सुरक्षेच्या बाबततीत सांगायचं झाल्यास यामध्ये नवे सुपर्ब 8-एअरबॅग्स, एबीएस आणि ईएससी हे फीचर्स आहेत. भारतीय बाजारात Volkswagen Passat आणि Honda Accord Hybrid यासांरख्या कारसोबत थेट टक्कर असेल.

या कारमध्ये 1.8-लीटर, 4-सिलींडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 180hp पावर आणि 320Nm टॉर्क जनरेट करतं. 6-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन असलेल्या इंजिनमध्ये कालांतराने ऑटोमॅटीक ट्रांसमिशनचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे.