फोनवर बोलणारी व्यक्ती आपल्याला दिसते व आपण तिच्याशी समोरासमोर बोलू शकतो, या वैशिष्टय़ांमुळे व्हिडीओ कॉलिंग जगभर प्रसिद्ध आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांची अ‍ॅप्स उपलब्ध आहेत उदाहरणार्थ स्काइप, व्हाॅट्सअॅप, हँगआउट्स, वाइबर, वी चॅट, गुगल डय़ुओ. यात मायक्रोसॉफ्ट कंपनीचा स्काइप अ‍ॅप्लिकेशन लोकप्रिय आहे. सध्या मेसेज पाठवण्यासाठी जसे व्हाट्सअ‍ॅप अग्रेसर आहे त्याचप्रमाणे व्हिडीओ कॉलिंगसाठी स्काइप प्रसिद्ध आहे.

स्काइपचा उपयोग करून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाइलवरून व्हिडीओ कॉल करू शकता. पण आता त्याचबरोबर व्हाॅट्सअॅप, फेसबुकवरूनही व्हिडीओ कॉल करता येतो. त्यामुळे स्काइपला स्पर्धा निर्माण झाली आहे. भारतातील लोकसंख्या आणि येथील वाढत जाणारा इंटरनेटचा वापर यामुळे अनेक कंपन्यांनी भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. मायक्रोसॉफ्टनेसुद्धा याच संधीचा उपयोग करून घेण्यासाठी स्काइपची नवीन आवृत्ती ‘स्काइप लाइट’ फक्त भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे. भारतामध्ये इंटरनेटचा पसारा जेवढा वाढत चालला आहे त्या मानाने मात्र येथील इंटरनेटचा वेग कमी आणि अस्थिर आहे. या कारणांमुळेच मायक्रोसॉफ्टने खास भारतीय ग्राहकांसाठी हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध केले आहे. यामुळे टू जी किंवा थ्रीजी असतानासुद्धा तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकता आणि तेसुद्धा विनामूल्य. यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च नाही फक्त तुमच्या मोबाइलमधे इंटरनेट असले पाहिजे. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ म्हणजे ते मायक्रोसॉफ्टच्या भारतातील हैदराबाद या कार्यालयात तयार केले आहे आणि अगदी सर्वसाधारण स्मार्ट फोनमध्येसुद्धा ते चांगले चालेल. सध्या तरी हे फक्त भारतातील ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. स्काइप लाइटमध्ये स्काइपसारखी अनेक वैशिष्टय़े आहेत. यात तुम्ही मेसेज पाठवू शकता, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकता. तुमच्या मोबाइलमध्ये इंटरनेटचा वेग चांगला असेल अथवा वायफायला जोडलेला असेल तर तुम्ही लावलेला कॉल हा एचडी असेल आणि जर तुमचा इंटरनेटचा वेग कमी असेल तर त्यानुसार तुमच्या कॉलची गुणवत्ता कमी-जास्त होईल. हे अ‍ॅप मोबाइलमध्ये फक्त तेरा एमबी एवढीच जागा घेते.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human
रोबोट आहे की तरुणी? चीनी रेस्टॉरंटमधील वेट्रेसची एकच चर्चा, Video पाहून सांगा, तुम्हाला काय वाटते?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
This Bhopal-based startup has impressed Anand Mahindra with its driverless car using Bolero model
बोलेरो मॉडेलचा वापर करून तयार केली Driverless Car ! भोपाळच्या स्टार्टअपवर आनंद महिंद्रा झाले खुश!
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

स्काइप लाइटमधे तुम्ही फोटोसुद्धा पाठवू शकता आणि तेसुद्धा कमी आकाराचे ज्यामुळे समोरच्या व्यक्तीलासुद्धा ते फोटो लगेच डाउनलोड करता येईल आणि तुमच्या मोबाइलमधील डेटासुद्धा कमी वापरला जाईल. याशिवाय जर तुम्हाला कोणी फोटो पाठविला तर तो अ‍ॅपमधूनच दुसऱ्या व्यक्तीला लगेच पाठवू शकता. व्हिडीओ कॉल करत असल्यामुळे इंटरनेट डेटा हा वापरला जातो आणि तो किती वापरला गेला हे कळणेसुद्धा गरजेचे आहे. स्काइप लाइटमध्ये तुम्ही इंटरनेटचा किंवा वायफायचा किती डेटा वापरला हेपण कळते. त्यातील अजून एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ते आधार कार्डला संलग्न असणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार जून २०१७ नंतर ही सेवा चालू होईल. यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलत आहात ती खरोखर तीच व्यक्ती आहे का हे कळू शकेल शिवाय याचा उपयोग नोकरीच्या ठिकाणी, वस्तू किंवा मालमत्ता विक्रीत होऊ शकतो. स्काइप बोट्स हे अजून एक वैशिष्टय़ या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे. बोट्स म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, यात तुम्ही बातम्या बघणे, खेळ खेळणे, वेबपेज बघणे यांसारख्या गोष्टी करू शकता. तुम्ही तुमच्या मित्राला जसे मेसेज पाठवता तसे मेसेज तुम्ही स्काइप बोट्समध्ये पाठवले तर तो तुम्हाला उत्तर देईल.

स्काइप लाइट फक्त भारतीयांसाठीच असल्याने ते भारतातील मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, तामिळ, तेलगू आणि उर्दू या वेगवेगळ्या सात भाषांमध्ये आहे. तुम्ही या अ‍ॅप्लिकेशनमध्ये जे संभाषण कराल ते पूर्णपणे सुरक्षित असेल असे कंपनीने सांगितले आहे. स्काइप लाइट गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

स्काइप लाइटचे फायदे :

-मोबाइलमध्ये कमी जागा वापरते.
-इंटरनेटचा कमी वापर.
-स्काइप बोट्स.
-भारतातील सात भाषांचा समावेश.
-आधार कार्डला संलग्न.

स्काइप लाइटचे तोटे :
-स्काइपमधील सगळी वैशिष्टय़े स्काइप लाइटमध्ये नाहीत.
-नवीन असल्यामुळे आणखी सुधारणा होऊ शकते.

 

सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com