बदलत्या जीवनशैलीचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होत असतो. सध्याची तरुणाई फास्ट फूडच्या आहारी गेली आहे. त्यामुळे त्यांच्या आहाराच्या पद्धतींमध्ये कमालीचा बदल झाल्याचं पाहायला मिळतं. परिणामी अनेकांना लठ्ठपणा ही समस्या निर्माण होते. मात्र लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक उपाय आहेत. डाएट करणे, जीमला जाणे यासारख्या गोष्टींच्या माध्यमातून आपण वजन कमी करु शकतो. मात्र जर एखादा व्यक्ती वजन कमी असण्याच्या समस्येने त्रस्त असेल तर त्यातून मार्ग काढणं कठीण होतं. अनेक उपाय करुनही काही जणांचं वजन वाढत नाही. वजन वाढण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थाचा समावेश करावा ते जाणून घेऊयात…

तुप –
तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅट व काही प्रमाणात कॅलरीजही असतात. शरीराला तंदुरुस्त बनवण्यासाठी आहारात तुपाचा समावेश करावा. तुपाचं नियमित सेवन केल्यास वजन वाढायाला फायद्याचं होतं. मात्र, तुपाचं सेवन अतिप्रमाणात करु नये..

केळी –
केळी या फळामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल असतात. मध्यम स्वरुपाच्या केळीत साधारणपणे १२० कॅलरी असतात. दररोज केळी खाल्ल्यास वजन वाढण्यास फायदा होऊ शकतो.

बदामाचं दुध –
बदामामध्ये आणि दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. बदामाच्या दुधाचं सेवन केल्यास वजन वाढण्यास नक्कीच फायदा होईल. दुधामध्ये बदाम, अंजीर, किशमिश, व सुखा मेवा टाकून सेवन केल्यास शरीर तंदुरुस्त होते.

बटाटा –
वजन वाढवण्यासाठी जेवणात बटाट्याचा वापर करा. बटाट्यांमध्ये प्रोटीन व्हिटॅमिन, मिनरल , कार्बोहाइड्रेट्स, कॉम्प्लेक्स शुगर असते. जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असते. शक्यतो तळलेला बटाटा खाणे टाळा.

अंडी –
प्रोटीनयुक्त पदार्थाचं सेवन केल्यास वजन लवकर वाढेल. अंडी वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट, प्रोटीन, जीवनसत्त्व आणि खनिज जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे मास पेशी वाढवण्यासाठीही उपयोग होतो. अंड्यामधील पिवळा भाग सोडून सफेद भागाचे नियमित सेवनाने वजन वाढते.

गव्हाचा ब्रेड –
गव्हाचा ब्रेड सुद्धा आपल्याला वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असतो. गव्हाच्या ब्रेडमध्ये शरीराला उपयुक्त असणारी सर्व पोषक तत्वे असतात. गव्हाच्या ब्रेड पासून कॅलरी व फायबर मिळते. गव्हाच्या ब्रेड पासून शरीराला उर्जा मिळते.

(हा सल्ल्यातून केवळ सर्वसामान्य माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारे अचूक उपचाराचा पर्याय नाही. यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)