सध्या बहुतेक लोक स्मार्टफोनच्या अधिन होऊ लागले आहेत. ज्याच्या हाती स्मार्टफोन ती व्यक्ती स्मार्ट असे समजले जाते. मात्र, त्यामुळे लोक आळशी बनू लागले असून याचा परिणाम त्यांच्या वजनावर होत आहे. ते लठ्ठ होऊ लागले आहेत. स्मार्टफोनमधल्या विविध अॅप्स आणि सोशल नेटवर्किंग साईट्समुळे लोक स्मार्टफोनला अधिन झाले आहेत. त्यामुळेच त्यांना लठ्ठपणासारख्या समस्येला सामोरे जावे लागते आहे.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेवियरल न्यूट्रिशिअ अँण्ड फिजिकल एक्टिविटीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार, जे लोक स्मार्टफोनचा वापर अधिक करतात ते आपल्या प्रकृतीच्या बाबतीत थोडा निष्काळजीपणा दाखवतात. केन्ट स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात असा निष्कर्ष काढण्यात आला की, टी.व्ही, आणि संगणकाप्रमाणे स्मार्टफोनमुळेही लोक आळशी होऊ लागले आहेत आणि याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. कॉलेजमध्ये जाणाऱ्या ३०५ विद्यार्थ्यांवर यासंबंधी परीक्षण करण्यात आले. यात तीन गटांमध्ये सर्वांना विभागण्यात आले. ज्यात ९० मिनिटांपेक्षा कमी स्मार्टफोनचा  वापर करणारे विद्यार्थी, ५ तास वापर करणारे विद्यार्थी, आणि १४ तास वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला गेला. त्यात स्मार्टफोनवर केले जाणारे सर्फिंग आणि शारिरीक हालचाली यांचे परीक्षण करण्यात आले.