निरोगी आरोग्यासाठी जीवनशैली चांगली असणे अतिशय आवश्यक असते. सध्या आपल्याला होणारे ७० ते ८० टक्के आजार हे चुकीच्या जीवनशैलीमुळे होतात, असे डॉक्टरांकडून वारंवार सांगण्यात येते. मात्र खाण्याच्या चुकीच्या वेळा, आहाराच्या अयोग्य पद्धती, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव आणि इतर अनेक गोष्टींमुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उदभवतात. याविषयी आपण बऱ्याच गोष्टी वाचतो आणि ऐकतोही. सध्या अशाच प्रकारचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सापशिडीच्या खेळाप्रमाणेच आरोग्याशी निगडीत गोष्टी अतिशय उत्तम पद्धतीने समजून सांगितल्या आहेत.

हे पदार्थ खा आणि थकवा दूर करा

आता सापशिडी म्हटल्यावर लहानपणी आपण खेळत असलेली सापशिडी डोळ्यांसमोर येते. सापाच्या तोंडातून खाली गेल्यावर होणारी हार आणि शिडीमुळे एकदा वर गेल्यावर मिळणारा आनंद आपल्याला आठवतो. पण दैनंदिन जीवनात कोणत्या चुकीच्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला खाली जाण्याची वेळ येते आणि चांगल्या गोष्टींचा अवलंब केल्यास आरोग्य कशापद्धतीने सुधारते हे अतिशय नेमक्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे.

या दिशेला डोके करुन झोपताय? काळजी घ्या

हा फोटो दवाखान्यात लावण्यात आला आहे, अशा कॅप्शनखाली तो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये तुम्ही धुम्रपान करत असाल तर तुम्हाला कोणत्या समस्या भेडसावतील, जंक फूड खाल्ल्यास काय त्रास होईल, दैनंदिन जीवनामध्ये अनियमितता असल्यास अशा गोष्टी सापाच्या तोंडाशी दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे होणारे त्रास सापाच्या शेपटीशी देण्यात आले आहेत. तर हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा आहारातील समावेश, अन्नपदार्थांमध्ये मिठाचे कमी प्रमाण, जिने चढणे अशा गोष्टी शिडीच्या खालच्या बाजूला दाखविल्या आहेत. म्हणजेच या चांगल्या गोष्टींचा अवलंब केल्यास तुमची तब्येत चांगली राहिल, असेच याठिकाणी सुचवायचे आहे. त्यामुळे रंगीबेरंगी अशी ही अनोखी सापशिडी तुम्ही तुमच्या घरातही लावू शकता. जेणेकरून कुटुंबातील सर्वांचेच आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल.