Social Media Day: What Happens in an Social Media Minute in 2018: आज अगदी तळहातावरील स्मार्टफोनपासून स्मार्ट टीव्हीपर्यंत सगळीकडेच इंटरनेट मस्ट झाले आहे. आजच्या जमान्यात आऊट ऑफ रेंज म्हणजेच प्रवाहाबाहेर असा सरळ हिशेब झाला आहे. म्हणूनच आज कोटींच्या संख्येने लोक समाज माध्यमांवर वावरतात. म्हणजेच अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री बेडवर गेल्यानंतरही अनेकजण कोणाला लाइक तर कोणाला फॉ़लो करत स्टॉक करत असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या इंटरनेटच्या मायाजालावर एका मिनिटांमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टी होतात? किती लोकं एकाच क्षणाला फेसबुकवर अॅक्टीव्ह असतील? एका मिनिटांला किती लोक युट्यूबवर व्हिडीओ पाहत असतील? किंवा मिनिटाला किती व्हॉट्सअप मेसेजेस जात असतील? असे प्रश्न तुम्हाला कधी पडलेत का? काय म्हणताय पडलेत… पण उत्तरं सापडली नाहीत. बरोबर कशी सापडणार कोण गुगल करणार ना एवढं व्हॉट्सअपवरच्या गप्पा आणि युट्यूबवरच्या व्हिडीओजला थांबवून. चला तुमच्यासाठी आम्हीच ही माहिती घेऊन आलोय.

२०१८ मध्ये एका मिनिटांमध्ये इंटरनेटवर काय होतेय

४,२०३,३६,००,००० म्हणजेच ४ अरब २०३ कोटी ३६ लाख फेसबुक लॉगइन्स होतात

१५,९८४,००,००,००० म्हणजेच १५ अरब ९८४ कोटी गुगल सर्च केले जातात

१६४,१६०,००,००, ००० म्हणजेच १६४ अरब १६० कोटी व्हॉट्सअप मेसेजेस पाठवले जातात

तर

८०७,८४०,००,००,००० म्हणजेच ८०७ अरब, ८४० कोटी ईमेल्स पाठवले जातात

दर मिनटाला

> दर मिनटाला १.८ कोटी टेक्सट मेसेजेस पाठवले जातात

> दर मिनटाला युट्यूबवर ४३ लाख व्हिडीओ पाहिले जातात

> दर मिनटाला १ लाख ७४ हजार इनस्ताग्राम स्कोल केले जातात

> दर मिनटाला ४ लाख ८१ हजार ट्विटस केले जातात

> दर मिनटाला १.१ कोटी टिंडर स्वॅप केले जातात

> दर मिनटाला ९ लाख ३६ हजार ट्विच पाहिले जातात

> दर मिनटाला २५ हजार जीफ इमेसेज मेसेंजवरून पाठवल्या जातात

> दर मिनटाला २ कोटी ४० लाख स्नॅप्स स्नॅपचॅटवर क्रिएट केले जातात

> दर मिनटाला ३ लाख ७५ हजार अॅप्स डाऊनलोड केले जातात