दिवसातून दोन तासांपेक्षा जास्त वेळ फेसबुक, ट्विटर या सारख्या सोशल मीडियावर वेळ घालवणाऱया किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य बिघडू शकते, असे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून पुढे आले आहे. या मुलांना मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो, त्याचबरोबर त्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ शकतात, असे संशोधनातील निष्कर्षांमध्ये म्हटले आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे माध्यमिक शाळांत शिकणारी मुले-मुली वेगवेगळ्या सोशल मीडियावर रोजच जात असतात. या साईटवर त्यांचे अकाऊंटही असते. मात्र, सोशल नेटवर्किंग साईटवरील मजकुर समंजसपणे बघण्याची मानसिकता या मुला-मुलींमध्ये निर्माण झालेली नसते. त्याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, असे संशोधनातून दिसून आले आहे. या वयातील पाल्यांच्या पालकांच्या दृष्टीनेही हे संशोधन महत्त्वाचे मानले जात आहे.
ओट्टावा येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी संशोधनातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले. सातवी ते बारावी या दरम्यान शिकणाऱया विद्यार्थ्यांना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. संशोधनात सहभागी झालेल्या मुलांपैकी २५ टक्के मुलांनी रोज दोन तासांपेक्षा जास्त काळ आपण सोशल नेटवर्किंग साईट्सवर असतो, असे सांगितले.
सायबर सायकॉलॉजी, बिहेव्हिअर अॅंड सोशल नेटवर्किंग या जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता