News Flash

TOP 5 : नववधू प्रिया मी बावरते, कानच्या रेड कार्पेटवर सोनमचा ‘खुबसूरत’ अंदाज

लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच फिल्म फेस्टिव्हल. ७१ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनमनं परिधान केलेल्या डिझायनर आऊटफिटचे काही निवडक फोटो

७१ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनमनं परिधान केलेल्या डिझायनर आऊटफिटचे काही निवडक फोटो

कान फिल्म फेस्टिव्हलला आतापर्यंत अनेकवेळा उपस्थिती लावलेल्या सोनम कपूरचा यावर्षीचा कान फेस्टिव्हल काहीसा वेगळा होता. लग्नानंतरचा हा तिचा पहिलाच फिल्म फेस्टिव्हल. गेल्या आठवड्यात आनंद अहूजासोबत ती विवाहबंधनात अडकली त्यानंतर तिनं आवर्जून या फिल्म फेस्टिव्हलला उपस्थिती लावली. कानच्या पहिल्याच दिवशी सोनम लेहंगा परिधान करून रेड कार्पेटवर अवतरली. सोनम ही लोरिअल या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची सदिच्छादूत आहे. बॉलिवूडची ‘फॅशनिस्टा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनमच्या रेड कार्पेट स्टाईलचं नेहमीच कौतुक होतं. चला तर मग, ७१ व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सोनमनं परिधान केलेल्या डिझायनर आऊटफिटचे काही निवडक फोटो पाहूयात.

पहिल्या दिवशी सोनमनं राल्फ अँड रुसो’च्या सफेद डिझायनर लेहंग्याला पसंती दिली. सोनमच्या हातांवर असणारी लग्नाची मेहंदी तिच्या या लूकला आणखीनच उठावदार करुन जात होती. एका साध्या वेणीवर असलेला आम्रपाली परांदा तिचा लूक परिपूर्ण करुन जात होता. कानच्या कार्पेटवर ही नववधू सगळ्यांच्याच नजरा वेधून घेत होती.

त्यानंतर सोनमने पहिल्या दिवसाच्या संध्याकाळी मिंट रंगाच्या ड्रेसला पसंती दिली. ७१ व्या कान चित्रपट महोत्सवात एका चॅरिटी डिनरसाठी सोनमने डेलपोझोच्या ड्रेसला पसंती दिली. ‘तुम्ही असं काम करा की जे करताना तुम्हाला आनंद वाटेल, मग तुम्हाला आयुष्यात कधीही दिवसा काम करावं लागणार नाही.’असं लिहित तिनं या ड्रेसचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. सोनमनं या फ्लॉरल ड्रेसवर गडद रंगाची ज्वेलरी परिधान केली होती.

 


त्यानंतर रेड कार्पेट वॉकसाठी तिनं वेरा वांगच्या ब्राईडल कलेक्शनमधील न्यूड गाऊनला पसंती दिली. या गाऊनमध्ये सोनम अत्यंत सुंदर दिसत होती.

त्यानंतर सोनमनं न्यूझीलंडमधील डिझायनर Emilia Wickstead च्या ड्रेसला पसंती दिली. लाल पांढऱ्या कँडी स्ट्रीप्स ड्रेसमध्ये सोनम अधिक खुलून दिसत होती. सोनमच्या या लूकचं स्टाईलिंग तिची बहिण रियानं केलं होतं. सोनम नेहमीच आपल्या स्टाईलमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहत असते.

कानमध्ये दीपिका, माहिरा खानसह सोनमनंदेखील डेनिम जीन्स आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टला पसंती दिली. या लूकमध्ये दीपिकाचं फारसं कौतुक झालं नसलं तरी सोनम मात्र तिच्या जगावेगळ्या निवडीमुळे तिच्यापेक्षा वरचढ ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 10:27 am

Web Title: sonam kapoor top 5 look in cannes 2018
Next Stories
1 भाजपच्या ‘शंभर नंबरी’ यशानंतर प्रकाश राज नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
2 माधुरी-करणचे बुमरॅंग एकदा पहाच !
3 विकी कौशल म्हणजे बॉलिवूडला मिळालेलं एक मौल्यवान रत्न, जाणून घ्या त्याच्याविषयीच्या काही रंजक गोष्टी
Just Now!
X