उकाड्यामुळे हैराण झाल्यावर ‘कपड्यांमध्येच एसी फिट केला तर किती मस्त’, हे वाक्य अनेकदा आपल्या कानावार आलं असेल. पण, सोनी कंपनीने हे करुन दाखवलं आहे. Sony ने ‘वेअरेबल एअर कंडिशनर Reon Pocket’ ची विक्रीही सुरु केली आहे.

गेल्या वर्षी लाँच केलेल्या Reon Pocket ची किंमत 13,000 जपानी येन ठेवण्यात आली आहे. भारतीय चलनानुसार ही किंमत जवळपास 9,000 रुपये आहे. अ‍ॅमेझॉन आणि सोनीच्या ऑनलाइन स्टोअरवर हा एसी उपलब्ध आहे, पण सध्या केवळ जपानमध्येच त्याची विक्री केली जात आहे. आकाराने अगदी लहान असलेला हा एसी तुम्हाला गरमीपासून बचावासाठी बनवण्यात आला आहे.

‘वेअरेबल एसी’चा आकार दिसायला अ‍ॅपल मॅजिक माउसइतका आहे. लहान असल्याने सहजपणे खिशातही हा ठेवता येतो. याशिवाय विशेष प्रकारे डिजाइन केलेल्या टी-शर्टच्या मागे हा एसी फिट करता येतो. एसीमध्ये एक अगदी लहान फॅन दिला असून तो गरम हवा बाहेर फेकतो. हा एसी एका स्मार्टफोन अॅपद्वारे लिंक करता येतो. अ‍ॅपद्वारे एसीचं टेंपरेचर अ‍ॅड्जस्ट करता येतं, तसंच यामध्ये ऑटोमॅटिक मोडही सिलेक्ट करता येतो.