News Flash

Sony Walkman चं पुनरागमन, वाय-फाय आणि फास्ट चार्जिंगचा सपोर्टही

बदलत्या काळानुसार वॉकमॅनमध्ये अनेक बदल

(PC : Sony India website)

एकेकाळी संगीतप्रेमी तरुणाईमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या सोनी वॉकमॅनचं पुनरागमन झालंय. जपानची दिग्गज कंपनी सोनीने आपला नवीन अँडॉइड वॉकमॅन(NW-A105)लाँच केला आहे. बदलत्या काळानुसार या वॉकमॅनमध्ये बदल करण्यात आले असून पहिल्यांदाच कंपनीकडून यात टच-स्क्रीन फीचर देण्यात आलंय. कंपनीने नवीन NW-A105 मॉडेल भारतात लाँच केले असून यामध्ये 3.6 इंच टच स्क्रीन एचडी डिस्प्ले आहे. हा वॉकमॅन अँड्रॉइड पाय ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असेल.

22 जानेवारीपासून देशातील सर्व ‘सोनी सेंटर्स’ आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. Sony NW-A105 वॉकमॅनवर युजर्सना 26 तासांची बॅटरी लाइफ मिळेल. या ऑडिओ डिव्हाइसमध्ये 4 जीबी रॅम व 16 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 128 जीबीपर्यंत वाढवता येईल. याशिवाय वॉकमॅनला गुगल ड्राइव्हचाही सपोर्ट आहे, त्यामुळे स्टोरेजची अधिक चिंता नाहीये.

‘हाय रिझोल्यूशन ऑडिओ सपोर्ट’ असलेल्या या वॉकमॅनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. लेटेस्ट वॉकमॅनमध्ये वाय-फाय सपोर्ट असून गाणी डाउनलोडही करता येतील. यात ब्लूटूथ आणि एनएफसी यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देखील आहेत. ब्लूटूथ कनेक्शनवर कंटेंट स्ट्रीमिंग अगदी सहजपणे करता येईल. या डिव्हाइसमध्ये S-मास्टर HX डिजिटल अँम्प्लिफायर असून याचं वजन केवळ 103 ग्रॅम आहे. कंपनीने बॅटरी क्षमतेबाबत माहिती दिलेली नाही पण यात फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याशिवाय युनिव्हर्सल 3.5mm हेडफोन जॅकदेखील आहे. खास संगीतप्रेमींसाठी हा वॉकमॅन कंपनीने बाजारात आणला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2020 4:22 pm

Web Title: sony walkman is back android powered walkman nw a105 launched in india sas 89
Next Stories
1 प्रोस्टेट कर्करोग निदानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
2 ‘सॅमसंग’चा ढासू स्मार्टफोन , दिवसभर टिकणार अवघ्या 30 मिनटांची चार्जिंग
3 श्वानाने दिला हिरव्या रंगाच्या पिल्लाला जन्म, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Just Now!
X